#Deccan #DakhniCulture #IndianHistory #MarathiHistory #SufiCulture
दखन । सांस्कृतीक, सामाजिक, भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण वारसा लाभलेला प्रदेश. दखनी ही दखनेची भाषा. त्यामुळे इथल्या संस्कृतीला दखनी ही ओळख मिळालेली. दखनेत दखनी अस्मितेचे अनेक नायक आहेत. मोगलांशी झुंजणारी चांदबीबी आणि तिचा सहकारी मलिक अंबर आहे, मराठीला राजभाषेचा दर्जा देणारा आणि कलेची राजधानी स्थापन करणारा इब्राहीम आदिलशहा हा दखनी संस्कृतीचा महत्वाचा नायक आहे. मलिक अंबरपासून टिपू सुलतानपर्यंत स्वातंत्र्यवीरांची ही भूमी आहे. या भूमीत शिवाजी महाराजांनी ‘‘हिंदवी’’ स्वराज्याची स्थापना केली. अलिकडे इतिहासाचा हा वारसा मागे पडतोय. त्यासाठीच आम्ही डेक्कन स्टडीज् हे युट्यूब चॅनेल सुरु केले आहे. इथे तुम्हाला सुफी संतांच्या, राज्यकर्त्यांच्या, सामान्य माणसांच्या अनोख्या कहाण्या पाहायला मिळतील.
#Dakhni #DeccanHistory #IndianHeritage #SufiSaints #HistoricalStories
#ShivajiMaharaj #TipuSultan #MalikAmbar #IbrahimAdilShah #ChandBibi
#UnityInDiversity #IndianCulture #HistoryDocumentary #MarathiYouTube
Deccan studies by Gaziuddin Academy
गाजीउद्दीन अकादमी | सुफी डॉक्युमेंटरी मालिकेसाठी सहयोग निधीचे आवाहन
-------------------------------
दख्खनच्या समृद्ध सूफी परंपरेचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने गाजीउद्दीन अकादमीने चार महिन्यांपूर्वी एक महत्त्वाकांक्षी डॉक्युमेंटरी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत दख्खनमधील २५ महत्त्वाच्या सूफी संतांवर संशोधनाधारित माहितीपट तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
आतापर्यंत या मालिकेतील १५ डॉक्युमेंटरी आमच्या YouTube चॅनेलवर प्रकाशित करण्यात आल्या असून, त्यांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रकल्पासाठी संस्थेने संशोधन, प्रवास, चित्रीकरण, संपादन आणि निर्मितीवर लाखो रुपयांचा खर्च केला आहे.
या ऐतिहासिक कार्याचा पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी आम्हाला आपल्या आर्थिक सहकार्याची आवश्यकता आहे. आपण आपल्या क्षमतेनुसार सहयोग निधी देऊन या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक उपक्रमात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
संस्थेच्या बँक खात्याचा तपशील खाली दिलेला आहे. आपण त्यावर आपली सहयोगाची रक्कम जमा करू शकता.
आपल्या सहकार्यामुळे दख्खनचा हा अमूल्य इतिहास अधिक व्यापकपणे जतन आणि प्रसारित करण्यास मोठी मदत होईल.
धन्यवाद!
गाजीउद्दीन अकादमी, सोलापूर
3 months ago | [YT] | 14
View 0 replies