महाराष्ट्रातील सामाजिक,शैक्षणिक ,कृषी,क्रिडा सह विवीध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेणारे न्यूज चॕनेल..आजच सबस्क्राइब करा..बेल आयकाॕन ला क्लिक करा व शेअर करा.
सोसायटी लाभांश वाटताना दिवाळीच्या मुहूर्तावर दोघांमध्ये फुटले 'शाब्दिक फटाके'!वातावरण झाले गरम पण....
मोडनिंब (संपादक - प्रा. रमेश शिरसट )
अनेक वर्षानंतर बृहत विविध कार्यकारी सोसायटीचा दिपावलीनिमित्त सभासद शेतकऱ्यांना लाभांश वाटप सोहळा पार पडला. हा लाभांश वाटप सोहळा सुरु असतानाच सोसायटीच्या दोन संचालकांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलेच शाब्दिक फटाके फुटल्याने थोडा वेळ वातावरण चांगलेच गरम झाले होते.हा झालेला फटाक्याचा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला अन दिवसभर तोच पंचक्रोशीत चवीने चर्चीला गेला. त्याच झाले असे की... लाभांश सोहळ्याच्या निमित्ताने सभासद.. शेतकरी सोसायटीच्या कार्यालयामध्ये एकत्र आले होते. मग या कार्यक्रमाचा 'श्री गणेशा' करण्यासाठी अहवाल वाचण्यासाठी व सोसायटी प्रगतीकडे झेपावली कशी याचे वाचन कारण्यासाठी उपस्थित असलेल्या 'शिवाजी' ला पाचारण करण्यात आले. या अहवाल वाचन प्रसंगी पवार साहेबांनी केलेल्या कर्जमाफिचा फायदा सभासदांना तर झालाच पण यामुळे सोसायटीदेखील प्रगतीपथावर आल्याचे सांगण्यात येत असताना याचवेळी उपस्थितामध्ये थोडी मोठी आवाजात चर्चा सुरु असल्याने थोडा गैरसमज झाल्याने उपस्थित असलेल्या 'माधव'ने 'औदूबरा'च्या या सहकार्याने यावर शब्दिक आक्षेप घेत सभासदांचा 'संतोष' करण्याचा प्रयत्न दोन तीन वेळा मोठया आवाजात केला...दोन तीन वेळा तोच मुद्दा पुढे आल्याने शांत बसलेल्या 'शिवाजी' ला हे सहन न झाल्याने त्याने पण मग 'शाब्दिक' फटाके फोडायला सुरुवात केली. एका बाजूने खरं काय ते सांगा म्हणून फटाके फोडली जात होती तर दुसरीकडून खोटं काय संगितलंय ते सांगा... गैरसमज झालाय तो काढा असं म्हणून शाब्दिक फटाके फोडण्यात येत होते. त्यामुळे लाभांश वाटप करताना चांगलेच शाब्दिक फटाके 'एकमेकांवर' फोडण्यात आली. उपस्थितांच्या मध्यस्थीने परत हे फटाके फुटायचे थांबले पण तोपर्यंत वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर मग या तापलेल्या वातावरणात लाभांश वाटपाचा सोहळा आणि photo सेशन ही परत सगळ्यांच्या साक्षीने आणि 'आनंदा'त पार पडले. हा सगळा प्रकार केवळ आणि केवळ 'शाब्दिक गैरसमज' व चालू असलेल्या चर्चेत मोठा आवाज असल्याने झाला पण तोपर्यंत फटाके फुटले तडा तडा उडले अन याचा आवाज पार गावाच्या बाहेर गेला...आरोप प्रत्यारोप झाले. याचीच चर्चा दिवसभर रंगली होती पण..... सोसायटी आणि सोसायटीच्या सभासदांसाठी एकत्र येऊन काम करण्याचे देखील परत ठरल्याने या शाब्दिक फुटणाऱ्या फटाक्यांचा आवाज शांत झाला.... असं व्हायला नको होतं पण झालं.... पण पुन्हा वातावरण शांत झाल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला.... हे सगळे एकीकडे होत असताना लाभांश वाटल्याने सभासदांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण होते... सभासदांची दिवाळी मात्र गोड झाली....जाता जाता असे फटाके पुन्हा फुटू नये असे खाजगीत सभासद बोलत होते हे मात्र खरे!
गांधी सप्ताहाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची विशेष कामगिरी १२८ गुन्हे नोंद १२२ आरोपींना अटक २१ वाहनांसह ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त !
माळशिरस (प्रतिनिधी -अनिल खंडागळे )
राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची मा. सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक व श्री.सौरभ अदाते उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर तसेच पोलीस विभागाच्या समन्वयाने प्रभावी गुन्हा अन्वेषण व धडक कारवाई करण्यात आली दिनांक २ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात एकूण १२८ गुन्हे उघडकीस आले त्यापैकी १२२ गुन्हयामध्ये आरोपी निष्पन्न झाले असून ६ गुन्हे बेवारस स्वरूपाचे आहेत एकूण ११९ आरोपींना अटक करण्यात आले असून २१ वाहने जप्त करण्यात आले आहे जप्त करण्यात आलेल्या वाहनाच्या किमतीसह एकूण मुद्देमालाची किंमत रु. ६५,९४,०८९/- इतकी आहे या व्यापक कारवाईत अवैध हातभट्टी निर्मिती दारू केंद्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे अवैध मद्य निर्मितीसाठी वापरण्यात येणारे मोठ्या प्रमाणातील रसायनसाठे, हातभट्टी, देशी व विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे त्यामुळे केवळ तयार अवैध मद्याच्या विक्रीवर कारवाई न करता त्याच्या निर्मितीच्या मुळ केंद्रावर कारवाई करून अवैध मध्ये निर्मिती केंद्राची साखळीच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे २ आक्टोबर २६ - बार्शी परिसरात करण्यात आलेल्या कारवाई ३ गुन्हे दाखल करून २ आरोपींना अटक करण्यात आली यामध्ये १०.२६ लिटर देशी मद्य ३९.४२ लिटर विदेशी मद्य ८८.२० लिटर बिअर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत ८४६१०/- आहे ३ आक्टोबर २६ - गुळवंची तांडा सेवालाल नगर मार्डी परिसरात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर अ विभाग ब विभाग व भरारी पथक क्र १ यांच्या संयुक्त कारवाई ८ गुन्हे उघडकीस आणण्यात आले ४ आरोपींना अटक करण्यात असुन १४८९० लिटर रसायन व १४५ लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली जप्त मुद्देमालाची किंमत ६,५४,९००/- आहे एका आरोपीविरुद्ध पुढील कारवाई चालू आहे ६ आक्टोबर २६. - माळशिरस विभाग व दुय्यम निरीक्षक क्र १,२,३ त्यांच्या संयुक्त कारवाईत माळशिरस तालुका परिसरात २ गुन्हे दाखल करून २ आरोपींना अटक करण्यात आली असून १८ लिटर देशी दारू ५५ लिटर ताडी व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे या मुद्देमालाची किंमत १,३५,१७५/- आहे ७ आक्टोबर २६ - सांगोला तालुका परिसर पंढरपूर विभाग व पंढरपूर दुय्यम निरीक्षक क्र २ व ३ यांच्या कारवाईत १ गुन्हा दाखल करुन १ आरोपीस अटक करण्यात आली ३४.५६ लिटर देशी दारू व १ चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे जप्त मध्ये मालाची किंमत १०,६५,३६०/- आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी यानिमित्ताने अवैध व्यावसायिकांना कडक शब्दात इशारा दिला आहे की "जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध मद्य धंदे खपवुन घेतले जाणार नाहीत" शहरी व ग्रामीण भागात कष्ट वाढवण्यात आले असून यापुढेही अशीच कारवाई सातत्याने चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे जे लोक या अवैध व्यवसायात आढळतील त्यांच्यावर अजामीनपात्र कलमान्वये गुन्हे दाखल करुन कठोर कायदेशीर पावले उचलली जातील आपल्या परिसरात कोठेही अवैध मद्य निर्माती किंवा विक्री होत असल्यास त्याची माहिती तात्काळ विभागाच्या टोल फ्री क्रमांक१८००२३३९९९९ किंवा व्हाॅटस अप क्रमांक ८४२२००११३३ वर कळवावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक राजू उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी आवाहन केले आहे
जन्मदात्या पित्याने सात वर्षाच्या चिमुकलीला केनॉलमध्ये फेकले.. चर्चेला उधाण
नांदेड - ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
एका जन्मदात्या पित्याने आपल्या सात वर्षाच्या मुलीला तेलगंणा राज्यात नेऊन केनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतले आहे. हत्येच कारण अद्याप ही अस्पष्ट आहे, मात्र आरोपीला तीन आपत्य आहेत आणि सरपंच पदाची तयारी सुरु केली होती. निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणातून पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरु आहे. दरम्यान या घटनेने परिसर हादरून गेला आहे. पांडुरंग कोंडामंगले (वय 32) अस आरोपी पित्याच नाव आहे.
आरोपी पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे. त्याचा बाऱ्हाळी येथे कटिंगची दुकान असून त्याला तीन आपत्य आहे. तीन दिवसा पूर्वी पांडुरंग कोंडामंगले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून सात वर्षाची चिमुकली प्राची कोंडमंगले हिला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनलमध्ये फेकून दिले. त्यानंतर तो घरीएकटाच परत आला. इकडे केनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला. पुढील चौकशीत संशय बळावल्याने ३० जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडामंगले यांना ताब्यात घेतले आणि अटक केली. या घटनेनेनंतर विविध चर्चेला उधाण आलं. आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याच बोलल्या जातं आहे. तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची त्याची तयारी असल्याची चर्चा होती. पण तीन असल्याने आपल्या निवडणुकीत तिसरे अपत्य अडसर ठरु नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा देखील सुरु आहे. हत्येच नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे.
मनिषा स्वप्निल तळेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
केम ( प्रतिनिधी ) केम तालुका करमाळा येथील सौ मनिषा स्वप्निल तळेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ४०वर्ष त्यांच्या पश्चात पती एक मुलगा सासु,सासरे असा परिवार आहे त्या सेवानिवृत्त शिक्षक देवीदास तळेकर यांच्या सुन होत्या त्या स्वामी समर्थ भक्त म्हणून परिचित होत्या त्यांच्या निधनाने केम परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.
देशमुख पट्टा वि का स सेवा संस्था मर्या कचरेवाडी संस्थेच्या चेअरमन पदी श्री रमेश बबनराव लवटे यांची बिनविरोध निवड
माळशिरस ( प्रतिनिधी - आनिल खंडागळे )
दि.३/१२/२०२५ रोजी संस्थेची सभा कार्यालयात श्री जाधव भाऊसो यांच्या अध्यक्षतेखाली खेडीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर सभेसाठी श्री तुकाराम देशमुख कचरेवाडी चे माजी सरपंच नवनाथ भाऊ कचरे , बाजीनाना सर्जे ,अभिजीत पाटील ,सुरेश लवटे ,बंटी लवटे, उमेश लवटे ,रामभाऊ कचरे, भरत कचरे ,संजय तरडे, गोरे सर,बाबा दनाने, विकास तेलंगे पाटील ,माणिकराव पाटील, ॲड नवनाथ देशमुख ,वैभव कोळेकर, पांडुरंग , नवनाथ कचरे ,(रेशन दुकान) सचिव सुनील सर्जे व तानाजी देशमुख हे हजर होते, नूतन चेअरमन श्री रमेश बाबुराव लवटे यांचा सर्व सभासदांच्या वतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
आमदार चिखलीकरांना लोह्यात धक्का ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष कल्याण सुर्यवंशी भाजपात
नांदेड ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष तथा लोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कल्याण सुर्यवंशी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कल्याण सुर्यवंशी यांचा भाजप प्रवेश म्हणजे आ. चिखलीकरांना मोठा धक्का समजला जात आहे. कल्याण सुर्यवंशी यांना मानणारा लोहा शहर व तालुक्यात मोठा वर्ग आहे. मागील अनेक दिवसांपासून आ. चिखलीकर यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. परंतु, अखेर कल्याण सुर्यवंशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व आ. चिखलीकर यांना सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण नेतृत्व मान्य करत भाजपात प्रवेश केला. खा. अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या गळ्यात भाजपचा रुमाल घालून त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे भाजप प्रभारी एकनाथ पवार, जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.
जगभरातून श्री.सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दिनिमित्त भाविक दाखल
नांदेड ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
भगवान श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पुट्टपार्थी, आंध्र प्रदेश येथे ११व्या श्री सत्य साई जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत आज ओडिशाचे राज्यपाल डॉ. हरी बाबू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, श्री सत्यसाई सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निमिष पंड्या, व्यवस्थापकीय विश्वस्त आर. जे. रत्नाकर, माजी केंद्रीय मंत्री खा.डॉ. भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर आणि जगभरातून आलेले भाविक उपस्थित होते.
अध्यक्षपदासाठी एकुण २१२ तर सदस्यपदासाठी २ हजार १५३ नामनिर्देशनपत्र दाखल.
नामनिर्देशनपत्राची १८ नोव्हेंबर 2025 रोजी होणार छाननी
नांदेड , दि.१७ ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व एका नगरपंचायतींच्या सन 2025 मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी सोमवार 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली होती. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत नांदेड जिल्ह्यात अध्यक्ष पदासाठी एकुण 212 तर सदस्य पदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आली आहेत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द होईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निहाय सोमवार 10 ते 17 नोव्हेंबर 2025 रोजी शेवटच्या दिनांकापर्यंत एकुण नामनिर्देशनपत्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
कुंडलवाडी नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 10 तर सदस्यपदासाठी एकुण 155 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
किनवट नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 28 तर सदस्यपदासाठी एकुण 267 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
लोहा नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 5 तर सदस्यपदासाठी एकुण 106 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
हदगाव नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 182 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
उमरी नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 7 तर सदस्यपदासाठी एकुण 104 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
भोकर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 32 तर सदस्यपदासाठी एकुण 208 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
मुखेड नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 12 तर सदस्यपदासाठी एकुण 122 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
हिमायतनगर नगरपंचायत अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
धर्माबाद नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 15 तर सदस्यपदासाठी एकुण 160 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
कंधार नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 8 तर सदस्यपदासाठी एकुण 120 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
मुदखेड नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 206 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
देगलूर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 11 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
बिलोली नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 145 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
Live Maharashtra Zone News
सोसायटी लाभांश वाटताना दिवाळीच्या मुहूर्तावर दोघांमध्ये फुटले 'शाब्दिक फटाके'!वातावरण झाले गरम पण....
मोडनिंब (संपादक - प्रा. रमेश शिरसट )
अनेक वर्षानंतर बृहत विविध कार्यकारी सोसायटीचा दिपावलीनिमित्त सभासद शेतकऱ्यांना लाभांश वाटप सोहळा पार पडला. हा लाभांश वाटप सोहळा सुरु असतानाच सोसायटीच्या दोन संचालकांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलेच शाब्दिक फटाके फुटल्याने थोडा वेळ वातावरण चांगलेच गरम झाले होते.हा झालेला फटाक्याचा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला अन दिवसभर तोच पंचक्रोशीत चवीने चर्चीला गेला.
त्याच झाले असे की... लाभांश सोहळ्याच्या निमित्ताने सभासद.. शेतकरी सोसायटीच्या कार्यालयामध्ये एकत्र आले होते.
मग या कार्यक्रमाचा 'श्री गणेशा' करण्यासाठी अहवाल वाचण्यासाठी व सोसायटी प्रगतीकडे झेपावली कशी याचे वाचन कारण्यासाठी उपस्थित असलेल्या 'शिवाजी' ला पाचारण करण्यात आले.
या अहवाल वाचन प्रसंगी पवार साहेबांनी केलेल्या कर्जमाफिचा फायदा सभासदांना तर झालाच पण यामुळे सोसायटीदेखील प्रगतीपथावर आल्याचे सांगण्यात येत असताना याचवेळी उपस्थितामध्ये थोडी मोठी आवाजात चर्चा सुरु असल्याने थोडा गैरसमज झाल्याने उपस्थित असलेल्या 'माधव'ने 'औदूबरा'च्या या सहकार्याने यावर शब्दिक आक्षेप घेत सभासदांचा 'संतोष' करण्याचा प्रयत्न दोन तीन वेळा मोठया आवाजात केला...दोन तीन वेळा तोच मुद्दा पुढे आल्याने शांत बसलेल्या 'शिवाजी' ला हे सहन न झाल्याने त्याने पण मग 'शाब्दिक' फटाके फोडायला सुरुवात केली.
एका बाजूने खरं काय ते सांगा म्हणून फटाके फोडली जात होती तर दुसरीकडून खोटं काय संगितलंय ते सांगा... गैरसमज झालाय तो काढा असं म्हणून शाब्दिक फटाके फोडण्यात येत होते.
त्यामुळे लाभांश वाटप करताना चांगलेच शाब्दिक फटाके 'एकमेकांवर' फोडण्यात आली. उपस्थितांच्या मध्यस्थीने परत हे फटाके फुटायचे थांबले पण तोपर्यंत वातावरण चांगलेच तापले होते.
त्यानंतर मग या तापलेल्या वातावरणात लाभांश वाटपाचा सोहळा आणि photo सेशन ही परत सगळ्यांच्या साक्षीने आणि 'आनंदा'त पार पडले.
हा सगळा प्रकार केवळ आणि केवळ 'शाब्दिक गैरसमज' व चालू असलेल्या चर्चेत मोठा आवाज असल्याने झाला पण तोपर्यंत फटाके फुटले तडा तडा उडले अन याचा आवाज पार गावाच्या बाहेर गेला...आरोप प्रत्यारोप झाले.
याचीच चर्चा दिवसभर रंगली होती पण..... सोसायटी आणि सोसायटीच्या सभासदांसाठी एकत्र येऊन काम करण्याचे देखील परत ठरल्याने या शाब्दिक फुटणाऱ्या फटाक्यांचा आवाज शांत झाला....
असं व्हायला नको होतं पण झालं.... पण पुन्हा वातावरण शांत झाल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला....
हे सगळे एकीकडे होत असताना लाभांश वाटल्याने सभासदांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण होते... सभासदांची दिवाळी मात्र गोड झाली....जाता जाता असे फटाके पुन्हा फुटू नये असे खाजगीत सभासद बोलत होते हे मात्र खरे!
10 hours ago | [YT] | 3
View 1 reply
Live Maharashtra Zone News
गांधी सप्ताहाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची विशेष कामगिरी १२८ गुन्हे नोंद १२२ आरोपींना अटक २१ वाहनांसह ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त !
माळशिरस (प्रतिनिधी -अनिल खंडागळे )
राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची मा. सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक व श्री.सौरभ अदाते उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर तसेच पोलीस विभागाच्या समन्वयाने प्रभावी गुन्हा अन्वेषण व धडक कारवाई करण्यात आली
दिनांक २ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात एकूण १२८ गुन्हे उघडकीस आले त्यापैकी १२२ गुन्हयामध्ये आरोपी निष्पन्न झाले असून ६ गुन्हे बेवारस स्वरूपाचे आहेत एकूण ११९ आरोपींना अटक करण्यात आले असून २१ वाहने जप्त करण्यात आले आहे जप्त करण्यात आलेल्या वाहनाच्या किमतीसह एकूण मुद्देमालाची किंमत रु. ६५,९४,०८९/- इतकी आहे
या व्यापक कारवाईत अवैध हातभट्टी निर्मिती दारू केंद्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे
अवैध मद्य निर्मितीसाठी वापरण्यात येणारे मोठ्या प्रमाणातील रसायनसाठे, हातभट्टी, देशी व विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे त्यामुळे केवळ तयार अवैध मद्याच्या विक्रीवर कारवाई न करता त्याच्या निर्मितीच्या मुळ केंद्रावर कारवाई करून अवैध मध्ये निर्मिती केंद्राची साखळीच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे
२ आक्टोबर २६ -
बार्शी परिसरात करण्यात आलेल्या कारवाई ३ गुन्हे दाखल करून २ आरोपींना अटक करण्यात आली यामध्ये १०.२६ लिटर देशी मद्य ३९.४२ लिटर विदेशी मद्य ८८.२० लिटर बिअर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत ८४६१०/- आहे
३ आक्टोबर २६ -
गुळवंची तांडा सेवालाल नगर मार्डी परिसरात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर अ विभाग ब विभाग व भरारी पथक क्र १ यांच्या संयुक्त कारवाई ८ गुन्हे उघडकीस आणण्यात आले ४ आरोपींना अटक करण्यात असुन १४८९० लिटर रसायन व १४५ लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली जप्त मुद्देमालाची किंमत ६,५४,९००/- आहे एका आरोपीविरुद्ध पुढील कारवाई चालू आहे
६ आक्टोबर २६. -
माळशिरस विभाग व दुय्यम निरीक्षक क्र १,२,३ त्यांच्या संयुक्त कारवाईत माळशिरस तालुका परिसरात २ गुन्हे दाखल करून २ आरोपींना अटक करण्यात आली असून १८ लिटर देशी दारू ५५ लिटर ताडी व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे या मुद्देमालाची किंमत १,३५,१७५/- आहे
७ आक्टोबर २६ -
सांगोला तालुका परिसर पंढरपूर विभाग व पंढरपूर दुय्यम निरीक्षक क्र २ व ३ यांच्या कारवाईत १ गुन्हा दाखल करुन १ आरोपीस अटक करण्यात आली ३४.५६ लिटर देशी दारू व १ चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे जप्त मध्ये मालाची किंमत १०,६५,३६०/- आहे
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी यानिमित्ताने अवैध व्यावसायिकांना कडक शब्दात इशारा दिला आहे की "जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध मद्य धंदे खपवुन घेतले जाणार नाहीत" शहरी व ग्रामीण भागात कष्ट वाढवण्यात आले असून यापुढेही अशीच कारवाई सातत्याने चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे जे लोक या अवैध व्यवसायात आढळतील त्यांच्यावर अजामीनपात्र कलमान्वये गुन्हे दाखल करुन कठोर कायदेशीर पावले उचलली जातील आपल्या परिसरात कोठेही अवैध मद्य निर्माती किंवा विक्री होत असल्यास त्याची माहिती तात्काळ विभागाच्या टोल फ्री क्रमांक१८००२३३९९९९ किंवा व्हाॅटस अप क्रमांक ८४२२००११३३ वर कळवावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक राजू उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी आवाहन केले आहे
4 weeks ago | [YT] | 11
View 0 replies
Live Maharashtra Zone News
तुम्हाला काय वाटते? लिहा कमेन्टबॉक्स मध्ये....
4 months ago | [YT] | 42
View 5 replies
Live Maharashtra Zone News
जन्मदात्या पित्याने सात वर्षाच्या चिमुकलीला केनॉलमध्ये फेकले.. चर्चेला उधाण
नांदेड - ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
एका जन्मदात्या पित्याने आपल्या सात वर्षाच्या मुलीला तेलगंणा राज्यात नेऊन केनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतले आहे. हत्येच कारण अद्याप ही अस्पष्ट आहे, मात्र आरोपीला तीन आपत्य आहेत आणि सरपंच पदाची तयारी सुरु केली होती. निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणातून पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरु आहे. दरम्यान या घटनेने परिसर हादरून गेला आहे. पांडुरंग कोंडामंगले (वय 32) अस आरोपी पित्याच नाव आहे.
आरोपी पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे. त्याचा बाऱ्हाळी येथे कटिंगची दुकान असून त्याला तीन आपत्य आहे. तीन दिवसा पूर्वी पांडुरंग कोंडामंगले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून सात वर्षाची चिमुकली प्राची कोंडमंगले हिला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनलमध्ये फेकून दिले. त्यानंतर तो घरीएकटाच परत आला. इकडे केनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला. पुढील चौकशीत संशय बळावल्याने ३० जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडामंगले यांना ताब्यात घेतले आणि अटक केली. या घटनेनेनंतर विविध चर्चेला उधाण आलं. आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याच बोलल्या जातं आहे. तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची त्याची तयारी असल्याची चर्चा होती. पण तीन असल्याने आपल्या निवडणुकीत तिसरे अपत्य अडसर ठरु नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा देखील सुरु आहे. हत्येच नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे.
9 months ago | [YT] | 7
View 0 replies
Live Maharashtra Zone News
मोडनिंब जि.प.व पं.स.गणासाठी भाजपा,राष्ट्रवादी (शरद पवार ) राष्ट्रवादी ( अजित पवार ) शिवसेना ( उबाठा ) शिवसेना (एकनाथ शिंदे ) की अपक्ष ? कोण मारणार बाजी ? तुम्हाला काय वाटते? लिहा कमेंट बाॕक्स मध्ये ...
9 months ago | [YT] | 40
View 1 reply
Live Maharashtra Zone News
तारीख: ८ डिसें, २०२५
मनिषा स्वप्निल तळेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
केम ( प्रतिनिधी )
केम तालुका करमाळा येथील सौ मनिषा स्वप्निल तळेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ४०वर्ष त्यांच्या पश्चात पती एक मुलगा सासु,सासरे असा परिवार आहे त्या सेवानिवृत्त शिक्षक देवीदास तळेकर यांच्या सुन होत्या त्या स्वामी समर्थ भक्त म्हणून परिचित होत्या त्यांच्या निधनाने केम परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.
10 months ago | [YT] | 18
View 0 replies
Live Maharashtra Zone News
देशमुख पट्टा वि का स सेवा संस्था मर्या कचरेवाडी संस्थेच्या चेअरमन पदी श्री रमेश बबनराव लवटे यांची बिनविरोध निवड
माळशिरस ( प्रतिनिधी - आनिल खंडागळे )
दि.३/१२/२०२५ रोजी संस्थेची सभा कार्यालयात श्री जाधव भाऊसो यांच्या अध्यक्षतेखाली खेडीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सदर सभेसाठी श्री तुकाराम देशमुख कचरेवाडी चे माजी सरपंच नवनाथ भाऊ कचरे , बाजीनाना सर्जे ,अभिजीत पाटील ,सुरेश लवटे ,बंटी लवटे, उमेश लवटे ,रामभाऊ कचरे, भरत कचरे ,संजय तरडे, गोरे सर,बाबा दनाने, विकास तेलंगे पाटील ,माणिकराव पाटील, ॲड नवनाथ देशमुख ,वैभव कोळेकर, पांडुरंग , नवनाथ कचरे ,(रेशन दुकान) सचिव सुनील सर्जे व तानाजी देशमुख हे हजर होते,
नूतन चेअरमन श्री रमेश बाबुराव लवटे यांचा सर्व सभासदांच्या वतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
11 months ago | [YT] | 7
View 0 replies
Live Maharashtra Zone News
आमदार चिखलीकरांना लोह्यात धक्का
ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष कल्याण सुर्यवंशी भाजपात
नांदेड ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष तथा लोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कल्याण सुर्यवंशी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कल्याण सुर्यवंशी यांचा भाजप प्रवेश म्हणजे आ. चिखलीकरांना मोठा धक्का समजला जात आहे.
कल्याण सुर्यवंशी यांना मानणारा लोहा शहर व तालुक्यात मोठा वर्ग आहे. मागील अनेक दिवसांपासून आ. चिखलीकर यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. परंतु, अखेर कल्याण सुर्यवंशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व आ. चिखलीकर यांना सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण नेतृत्व मान्य करत भाजपात प्रवेश केला. खा. अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या गळ्यात भाजपचा रुमाल घालून त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे भाजप प्रभारी एकनाथ पवार, जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.
11 months ago | [YT] | 4
View 0 replies
Live Maharashtra Zone News
जगभरातून श्री.सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दिनिमित्त भाविक दाखल
नांदेड ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
भगवान श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पुट्टपार्थी,
आंध्र प्रदेश येथे ११व्या श्री सत्य साई जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत आज ओडिशाचे राज्यपाल डॉ. हरी बाबू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, श्री सत्यसाई सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निमिष पंड्या, व्यवस्थापकीय विश्वस्त आर. जे. रत्नाकर, माजी केंद्रीय मंत्री खा.डॉ. भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर आणि जगभरातून आलेले भाविक उपस्थित होते.
11 months ago | [YT] | 10
View 0 replies
Live Maharashtra Zone News
अध्यक्षपदासाठी एकुण २१२ तर सदस्यपदासाठी २ हजार १५३ नामनिर्देशनपत्र दाखल.
नामनिर्देशनपत्राची १८ नोव्हेंबर 2025 रोजी होणार छाननी
नांदेड , दि.१७ ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व एका नगरपंचायतींच्या सन 2025 मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी सोमवार 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली होती. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत नांदेड जिल्ह्यात अध्यक्ष पदासाठी एकुण 212 तर सदस्य पदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आली आहेत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द होईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निहाय सोमवार 10 ते 17 नोव्हेंबर 2025 रोजी शेवटच्या दिनांकापर्यंत एकुण नामनिर्देशनपत्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
कुंडलवाडी नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 10 तर सदस्यपदासाठी एकुण 155 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
किनवट नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 28 तर सदस्यपदासाठी एकुण 267 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
लोहा नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 5 तर सदस्यपदासाठी एकुण 106 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
हदगाव नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 182 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
उमरी नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 7 तर सदस्यपदासाठी एकुण 104 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
भोकर नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 32 तर सदस्यपदासाठी एकुण 208 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
मुखेड नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 12 तर सदस्यपदासाठी एकुण 122 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
हिमायतनगर नगरपंचायत
अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
धर्माबाद नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 15 तर सदस्यपदासाठी एकुण 160 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
कंधार नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 8 तर सदस्यपदासाठी एकुण 120 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
मुदखेड नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 206 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
देगलूर नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 11 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
बिलोली नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 145 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
11 months ago | [YT] | 3
View 0 replies
Load more