Oneness Films is one of the best Marathi short film channels, creating high-quality, independent narrative stories and cinematic Marathi short movies.
Oneness films is a production company based in Mumbai India. Our team of creatives are all experts in their chosen field. We began our journey with having a dreams in our mind & today we have grown into production house.
onenessfilms
२,३०,०००+ घरांमध्ये, मनामनांत पोहोचलेली बाप-लेकाची ही हळवी गोष्ट! ❤️✨
बाप आणि आम्ही’ला प्रेक्षकांनी जो भरभरून प्रतिसाद दिलाय आणि कमेंट्समध्ये स्वतःच्या वडिलांच्या आठवणी मोकळेपणाने मांडल्या आहेत, त्याने मन कृतार्थ झालंय.
केवळ व्ह्यूजचा आकडा नाही, तर २ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी ही कथा अनुभवली ही आमच्या संपूर्ण टीमसाठी सर्वात मोठी दाद आहे! 🙏
अजूनही तुम्ही किंवा तुमच्या मित्रपरिवाराने ही फिल्म पाहिली नसेल, तर नक्की पहा आणि आपल्या भावना आम्हाला कळवा.
#BaapAaniAmhi #230KViews #Gratitude #OnenessFilms #MarathiShortFilm #SatishPulekar #AashayKulkarni
5 hours ago | [YT] | 11
View 0 replies
onenessfilms
‘बाप आणि आम्ही’ review
बाप आणि मुलाचं नातं…
या नात्याला शब्दांची फारशी गरज नसते.
कधी बापाचा राग असतो, कधी त्याची शिस्त असते, कधी त्याचं मौन असतं… पण या सगळ्याच्या मागे दडलेलं असतं ते फक्त आणि फक्त मुलासाठीचं प्रेम!
‘बाप आणि आम्ही’ हा लघुपट याच न बोलल्या जाणाऱ्या भावनांना पडद्यावर घेऊन आला आहे.
माझी स्वतःची पहिली प्रतिक्रिया..... 'ही तर माझीच कथा आहे!’
कदाचित ही फक्त माझीच प्रतिक्रिया नसेल .....तुमचीही असू शकते.....
कारण आपल्या आयुष्यातही असा बाप असतो… ज्याने कधी आपल्याला जवळ घेऊन ‘मला तुझा अभिमान आहे’ असं अस कौतुक केलं नसेल; पण आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या यशाची नोंद त्याने मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली असेल.
या कथेतला मुलगा ( आशय कुलकर्णी ) आयुष्यभर आपल्या वडिलांकडून (सतीश पुळेकर) एका छोट्याशा कौतुकाच्या शब्दाची आणि कौतुकाच्या पाठीवरल्या शाबासकीची अपेक्षा करत असतो.
‘शाब्बास!’
फक्त एवढाच एक शब्द… आणि पाठीवरचा हात....
पण बापाच्या तोंडून तो शब्द काही बाहेर पडत नाही बरं....
मुलगा मोठा होतो. स्वतःच्या पायावर उभा राहतो. लेखन करतो. तो स्क्रिप्ट रायटर असतो. त्याच्या लिखाणाला प्रसिद्धी मिळते.एक चित्रपटही तयार झालेला असतो.
वर्तमानपत्रांमध्ये त्याच्याबद्दल बातम्या येतात. त्याची कात्रणे प्रसिद्ध होतात…
पण विशेष म्हणजे ही कात्रणे मुलगा नाही, तर वडील जपून ठेवतात!
ज्या बापाला मुलाच्या यशाचं कौतुक तोंडाने करता येत नाही, तोच बाप मुलाच्या यशाच्या आठवणी मात्र अगदी जपून ठेवतो.
म्हणजे बापाला मुलाचा अभिमान नसतो असं नाही…
अभिमान तर असतोच, पण तो व्यक्त करण्याची त्याची पद्धत वेगळी असते.
मुलगा कुठेही पोहोचला तरी त्याच्या यशामागे शांतपणे उभा असतो.
बापाचं प्रेम असंच असतं…
ते दिसत कमी आणि जाणवत जास्त!
‘बाप आणि आम्ही’ या लघुपटाची खरी ताकद याच भावनेत आहे.
वर्षानुवर्षे बाप आणि मुलामध्ये असलेलं भावनिक अंतर एका संवादाने कसं मिटतं, हे पाहताना मन हेलावून जातं.
आणि मग येतो तो शेवटचा सीन…!
या संपूर्ण कथेला वेगळाच अर्थ देणारा हा शेवट आणि त्यातील ट्विस्ट खरंच भारी आहे.
आत्तापर्यंत आपण जे पाहत आलो असतो, त्याकडे पुन्हा नव्याने पाहायला लावणारा हा प्रसंग आहे. शेवटचा क्षण संपतो… पण कथा मात्र मनात सुरू राहते.
आणि त्या भावनिक वातावरणात आईचा ऐकू येणारा आवाज आणखी एक वेगळीच हुरहूर मनात निर्माण करतो. हा आवाज कोणाचा आहे मला पर्सनल मॅसेज करून सांगा. आईच्या त्या प्रेमळ आणि काळजी करणाऱ्या आवाजा मुळे प्रसंगाची भावनिक परिणामकारकता आणखी वाढते.
या लघुपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पडद्यामागची संपूर्ण टीम......
Oneness Films प्रस्तुत या लघुपटाचे लेखक आणि दिग्दर्शक निलेश अरुण कुंजिर यांनी बाप-मुलाच्या नात्यातील अत्यंत साधी, पण मनाच्या खोलवर जाणारी भावना मांडली आहे.
निलेश कुंजीर यांचा ' कोंकण व्हाया घाट ' ही शॉर्ट फिल्म सुद्धा मला आवडली होती.याही फिल्म चे विश्लेषण माझ्या FB पेज
ला वाचायला मिळेल. तेही अगदी माझ्या नाशिकच्या गावरान भाषेत,माझ्या खास शैलीत....
निर्माता स्वप्नील सुधीर लाके, छायांकन प्रताप विश्वास जोशी, पार्श्वसंगीत अनुराग गोडबोले, तर संकलन आणि DI Color ऑक्युलस कॅप्चर यांचे आहे.
कला दिग्दर्शन सुमित पाटील यांचे असून ध्वनीमुद्रण व मिक्सिंग वृंदा अडीवेकर यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता म्हणून पूनम विठ्ठल मुळीक यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
विशेष सहकार्यासाठी वर्षा दांडळे, ललिता काकडे आणि निमिष कुलकर्णी यांचे योगदानही महत्त्वाचे आहे.
पण शेवटी या सगळ्यापेक्षा मोठा कलाकार आहे तो…
‘बाप’!
कारण बापाची भूमिका प्रत्येकाच्या आयुष्यात असते.
कुणाचा बाप अजून आपल्या सोबत असतो…
कुणाचा फक्त आठवणीत…
कुणाला बापाने कधीच ‘मला तुझा अभिमान आहे’ असं सांगितलेलं नसतं…
पण कदाचित त्यानेही कुठेतरी आपल्या मुलाची एखादी छोटीशी आठवण जपून ठेवलेली असते.
कदाचित एखादं प्रमाणपत्र…
एखादा फोटो…
एखादं वर्तमानपत्राचं कात्रण…
आणि म्हणूनच ‘बाप आणि आम्ही’ हा केवळ लघुपट राहत नाही.
तो आपल्या आणि आपल्या बापाच्या नात्याचा आरसा बनतो.
पडदा काळा होतो…
कथा संपते…
पण मनात एकच प्रश्न राहतो..,.
आपल्या बापाने आपल्यावर किती प्रेम केलं, हे आपण कधी त्याला विचारलं का?
किंवा.... आपण बापावर किती प्रेम करतो हे त्यांना सांगितलं का?
नाही ना.....
मग विचारा....
सतीश पुळेकर आणि आशय कुलकर्णी यांच्या अभिनयाचे कौतुक....लेखन आणि दिग्दर्शनाला फुल्ल मार्क्स....
U ट्यूब वर फिल्म उपलब्ध आहे....
नक्की बघा....
ही तुमचीच कथा आहे....
#facebookpost #explorepage #explore
#shortfilm #marathicinema
4 days ago | [YT] | 39
View 0 replies
onenessfilms
‘बाप आणि आम्ही’ रिलीज झाल्यापासून युट्यूब कमेंट्समध्ये जो प्रेमाचा वर्षाव सुरू आहे, तो निखळ आणि अनमोल आहे. प्रत्येकाने ही कथा आपल्या घरातली, स्वतःच्या वडिलांची मानून स्वीकारली, हेच या कथेचं यश आहे.
तुमच्या याच प्रेमासाठी संपूर्ण टीमकडून शतशः धन्यवाद! ❤️
🎬 फिल्म युट्यूबवर ‘वननेस फिल्म्स’ चॅनेलवर उपलब्ध आहे.
नक्की पहा आणि शेअर करा!
#BaapAaniAmhi #ThankYouAll #AudienceReaction #MarathiCinema #OnenessFilms
6 days ago | [YT] | 66
View 4 replies
onenessfilms
‘बाप आणि आम्ही’ या आमच्या छोट्याशा प्रयत्नाला तुम्ही सर्वांनी जे भरभरून प्रेम दिलंय, त्यासाठी संपूर्ण टीमकडून मनापासून आभार! ❤️
पडद्यावर दिसणारी गोष्ट जितकी हळवी आणि खरी वाटली, त्यामागे पडद्यामागे उभ्या असलेल्या या प्रत्येकाची तितकीच मेहनत आणि आपुलकी होती.
अजूनही फिल्म पाहिली नसेल, तर नक्की पहा आणि आपल्या भावना कमेंट्समध्ये कळवा!
BaapAaniAmhi #BehindTheScenes #TeamWork #OnenessFilms #ShortFilm #Grateful
1 week ago | [YT] | 84
View 7 replies
onenessfilms
अवघ्या काही तासांत तुम्ही “बाप आणि आम्ही”वर भरभरून प्रेम केलंत... ❤️
तुमच्या प्रत्येक view, share, comment आणि प्रेमासाठी मनापासून धन्यवाद! 🙏❤️
तुम्ही अजून पाहिली नसेल, तर लगेच पहा आणि तुमच्या भावना नक्की कळवा! 🎬✨
असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या.
Video link https://www.youtube.com/watch?v=XpYyK...
#BaapAniAmhi #MarathiShortFilm #MarathiCinema #SatishPulekar #AashayKulkarni
1 week ago | [YT] | 83
View 4 replies
onenessfilms
ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेता आशय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेली आमची नवी शॉर्ट फिल्म—
‘बाप आणि आम्ही’
बाप-लेकाच्या नात्यातला हा हळवा, गोड संवाद आता पहा फक्त ‘वननेस फिल्म्स’च्या युट्यूब चॅनेलवर!
पाहण्यासाठी लिंक:
https://youtu.be/XpYyKcuXZy4?si=LHOnx...
#BaapAaniAamhi #SatishPulekar #AashayKulkarni #OnenessFilms #WatchNow
1 week ago | [YT] | 69
View 4 replies
onenessfilms
न बोलता समजून घेतलेलं प्रेम, मनात जपलेली काळजी
आणि दोन पिढ्यांमधली एक हळवी गोष्ट…
ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेता आशय कुलकर्णी
यांच्या प्रमुख भूमिका असलेली आमची नवी कलाकृती—
‘बाप आणि आम्ही’
उद्या संध्याकाळी ७.३० वाजता
फक्त ‘वननेस फिल्म्स’च्या युट्यूब चॅनेलवर!
#BaapAaniAamhi #SatishPulekar #AashayKulkarni #OnenessFilms #MarathiShortFilm
1 week ago | [YT] | 28
View 0 replies
onenessfilms
प्रतीक्षा संपली!
बाप-लेकाच्या नात्याची एक अनपेक्षित,
गोड गोष्ट घेऊन येत आहोत…
‘बाप आणि आम्ही’
🗓️ बुधवार, ९ सप्टेंबर २०२६
🎥 वननेस फिल्म्स युट्यूब चॅनेलवर
तारीख आणि वेळ लॉक करा!
#BaapAaniAamhi #OnenessFilms #ShortFilmComingSoon #9thSept #MarathiCinema
2 weeks ago | [YT] | 26
View 0 replies
onenessfilms
कधी कधी न बोलताही खूप काही सांगायचं असतं…
बाप आणि मुलाच्या नात्यातला न व्यक्त झालेला एक गोड, हळवा कोपरा.
‘बाप आणि आम्ही’ — लवकरच आपल्या भेटीस
‘वननेस फिल्म्स’च्या युट्यूब चॅनेलवर!
#BaapAaniAamhi #OnenessFilms #MarathiCinema #ShortFilm #FatherSonBond
2 weeks ago | [YT] | 24
View 0 replies
onenessfilms
'कोकण व्हाया घाट' ला मिळणाऱ्या या अथांग प्रेमासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार!
सुमन आणि मधुराची ही गोड-तिखट गोष्ट तुम्हा सर्वांच्या मनाला स्पर्श करून गेली,
याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. ३ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा प्रवास पाहिला आणि आवडला!
🎬✨ जर तुम्ही अजूनही हा सुंदर प्रवास पाहिला नसेल,
तर नक्की पहा! तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रेम असंच पाठीशी राहू द्या!
कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला? ❤️
#KokanVayaGhat #300KViews #OnenessFilms
#PratikshaLonkar #DevikaDaftardar #MarathiShortFilm #ThankYou #Trending
1 month ago | [YT] | 44
View 2 replies
Load more