TN Maharashtra News



TN Maharashtra News

महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रभाग १५ मध्ये विशेष पाहणी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका सौ. श्रीदेवीताई जॉन फुलारे यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याची पाहणी केली.
यावेळी पुतळ्याची रंगरंगोटी, कारंज्याची दुरुस्ती, स्वच्छता, मंडप व्यवस्था, ड्रेनेज साफसफाई आणि वृक्षारोपणाची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आल्या.यावेळी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते. #महात्मा_गांधी_जयंती #श्रीदेवीताई_फुलारे #प्रभाग_१५ #गांधी_जयंती_पूर्वतयारी #सोलापूर #सोलापूर_महानगरपालिका #महात्मा_गांधी_पुतळा #स्वच्छता_अभियान #वृक्षारोपण #विकासकामे #SolapurNews #GandhiJayanti #Ward15 #TNMaharashtraNews #TNमहाराष्ट्रNews

1 week ago | [YT] | 0

TN Maharashtra News

SIR विरोधात राज-उद्धव ठाकरे एकत्र! ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा..
निवडणूक आयोगाच्या SIR अर्थात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.
या मोर्चात इतर राजकीय पक्षांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
#RajThackeray #UddhavThackeray #SIR #ElectionCommission #MaharashtraPolitics #Mumbai #MarathiNews #MaharashtraNews #TNMaharashtraNews #राजठाकरे #उद्धवठाकरे #मुंबई #निवडणूकआयोग

1 week ago | [YT] | 0

TN Maharashtra News

📢 GNM प्रवेश अर्ज (2026-27) भरताना खालील माहिती भरावी:
अर्जदाराचे पूर्ण नाव (आडनाव, नाव, वडिलांचे/पतीचे नाव, आईचे नाव):
पालकांचे पूर्ण नाव:
अर्जदाराशी नाते:
पालकांचा व्यवसाय:
वार्षिक उत्पन्न:
अर्जदार विवाहित / अविवाहित:
विवाहित असल्यास लग्नानंतरचे पूर्ण नाव:
पतीचे पूर्ण नाव (लागू असल्यास):
संपूर्ण पत्ता (पिन कोडसह):
पालकांचा मोबाईल नंबर:
विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर:
कायमचा पत्ता:
जात व पोटजात:
जन्मतारीख (शाळा/कॉलेज सोडल्याच्या दाखल्याप्रमाणे):
जन्मठिकाण :
HSC (बारावी) पास झाल्याचे वर्ष:
शाखा (Science/Arts/Commerce):
कितव्या प्रयत्नात उत्तीर्ण:
टक्केवारी :
एकूण गुण (उदा. 600 पैकी मिळालेले गुण):

📢 महत्त्वाची सूचना – GNM प्रवेश 2026-27
सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज पूर्णपणे व अचूक माहिती भरून, त्यावर आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षरी करून, आवश्यक झेरॉक्स प्रती जोडून कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जमा कराव्यात.
#TNMaharashtraNews #GNMAdmission2026 #GNM_Nursing #Admission #GNM_Course #GNM

3 months ago | [YT] | 3

TN Maharashtra News

प्रभाग क्रमांक २२अ भाजपचे नगरसेवक
दत्तात्रय नडगिरी
यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
समाजासाठी केलेले त्यांचे कार्य आणि योगदान कायम स्मरणात राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐💐

#भावपूर्ण_श्रद्धांजली
#RIP
#Solapur
#BJP
#नगरसेवक
#TNमहाराष्ट्रNews
#BreakingNews
#SolapurNews
#TNMaharashtraNewsChannel

4 months ago | [YT] | 2

TN Maharashtra News

राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात होणारी बेसुमार वृक्षतोड तातडीने थांबवून महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांच्याकडे केली.

बालाजी सरोवर सोलापूर येथे झालेल्या भेटीत उपमहापौर देवकर यांनी पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. विशेषतः राष्ट्रीय महामार्ग क्र. 54 वरील सोलापूर ते विजापूर या 102 किलोमीटर मार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात देशी वृक्षांची लागवड करावी, जेणेकरून प्रदूषण नियंत्रणासोबतच भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण होईल, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

🌱 रोपटे भेट देत दिला पर्यावरणाचा संदेश
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना प्रतीकात्मक रोपटे भेट देऊन “विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखा” हा संदेश दिला. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उपमहापौरांनी दिली.

या प्रसंगी आमदार मा. सुभाष देशमुख साहेब यांचे मार्गदर्शन लाभले, नगरसेवक सात्विक बडवे, प्रशांत बडवे, पंचायत समिती सदस्य अंबिकाताई पाटील, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

“हरित भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग परिसरात वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. केवळ झाडे लावून चालणार नाही, तर त्यांच्या संगोपनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे मत उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केले.

📌 ठळक मागण्या :
▪️ राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोड तात्काळ थांबवावी.
▪️ NH-54 सोलापूर-विजापूर 102 किमी मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण मोहीम राबवावी.
▪️ ‘हरित महामार्ग धोरणा’ची काटेकोर अंमलबजावणी करावी.
▪️ लावलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावा.

केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोलापूर जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. #GreenHighway #SaveTrees #TreePlantation #NitinGadkari #Solapur #NH54 #Environment #HaritBharat #SolapurNews #MaharashtraNews #GoGreen #Vriksharopan #EcoFriendly #GreenIndia #BalajiSarovar
#TNMaharashtraNews

4 months ago | [YT] | 3

TN Maharashtra News

🌱 मातृत्व दिनानिमित्त ‘आईच्या नावे एक झाड’ उपक्रम उत्साहात संपन्न 🌱

सोलापूर : मातृत्व दिनाचे औचित्य साधत शासनाच्या “आईच्या नावे एक झाड” या संकल्पनेला प्रतिसाद देत तसेच पंतप्रधानांनी दिलेल्या “एक पेड़ माँ के नाम” या आवाहनानुसार आज विणकर उद्यान येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी आपल्या वसुंधरा मातेला प्रणाम करत मातृत्व दिन वृक्षारोपणाद्वारे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पुढील काळातही सातत्याने वृक्षलागवड व संवर्धन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास शहराच्या वसुंधरा रक्षक तथा उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर, स्वीकृत नगरसेवक ज्ञानेश्वर मायकल सर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सर, विशेष कार्यकारी अधिकारी महेशजी देवकर, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर, उद्यान विभागाचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. मातृत्व दिनानिमित्त आईप्रती कृतज्ञता व्यक्त करत वृक्षसंवर्धनाची शपथ घेण्यात आली.
पुढील काळात सोलापूर महानगरपालिका, विविध शासकीय विभाग, संस्था व पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्या लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी दिली.
🌍 “आईच्या नावे एक झाड, पृथ्वीच्या रक्षणासाठी सकारात्मक पाऊल” असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला.
#TNMaharashtraNews ##आईच्या_नावे_एक_झाड 🌱
#मातृत्वदिन #TreePlantation #EkPedMaaKeNaam
#Environment #GreenSolapur

4 months ago | [YT] | 6

TN Maharashtra News

“दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; उद्या दुपारी १ वाजता निकाल जाहीर!” 🎓📢 #TNMaharashtraNews
#SSCResult2026 #10वीनिकाल #दहावीचानिकाल #MahaSSCResult #BoardResult #SSCExam #MaharashtraBoard #ResultDay #Students #BreakingNews 🎓📢

5 months ago | [YT] | 6

TN Maharashtra News

Breaking:
बारावीचा निकाल 2 मे रोजी जाहीर! 🚨

शनिवार, दिनांक 2 मे रोजी बारावी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार असून, त्यानंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in वर पाहता येईल.
#HSCResult
#12thResult
#MaharashtraBoard
#Result2026
#BreakingNews
#बारावी_निकाल
#HSC2026
#ExamResult
#StudentUpdate
#EducationNews
#Mahahsscboard
#मराठीबातम्या
#MaharashtraNews
#ResultDay
#BoardExam

5 months ago | [YT] | 2

TN Maharashtra News

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन

कोल्हापूर :- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे (वय 53 वर्षे ) यांचे आज गुरुवार दि. 30 एप्रिल 2026 रोजी अल्प्‍शा आजाराने दु:खद निधन झाले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्या नात होत्या तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या कन्या व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभ गावडे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गुरुदेव कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील संस्थेच्या परिसरातील शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे शुक्रवार दि. 1 मे 2026 रोजी सकाळी 9.00 ते सकाळी 11.00 या वेळेत ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधी शुक्रवार दि. 1 मे 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता पंचगंगा स्मशानभूमी, कोल्हापूर येथे करण्यात येणार आहे. त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी देशातील, राज्यातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक इत्यादी विविध क्षेत्रातील मान्य्वर उपस्थित राहणार आहेत.

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी 1954 साली स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये सन 2008 पासून सलग 18 वर्षे सचिवा म्हणून त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा शैक्षणिक, सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे सांभाळला. संस्थेच्या सुमारे 410 संस्कार केंद्रातून त्यांच्या सचिवा पदाच्या प्रशासकीय कालावधीत त्यांच्या कार्यकर्तृत्वातून शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक बदल करण्यासाठी त्यांनी नवनवीन योजना संस्थेच्या विविध शाखांमध्ये राबविल्या. इंजिनिअरींग, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, आर्टिफिशीयल इंटिलिजन्स्, लॉ कॉलेज या शाखांचा शुभारंभ त्यांच्या कार्यकाळात झाला. त्यांनी संस्थेच्या विविध शाखांना गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढविला. संस्थेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी साहित्य्, नृत्य्, नाटय्, कला, संगीत आणि इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत, जर्मन भाषांच्या विकासासाठी महत्व्‍पूर्ण योगदान दिले. त्यांचे शिक्षणविषयक विचार समाजाच्या प्रबोधन विकासासाठी मार्गदर्शक आहेत.

त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये सहशिक्षिका, प्राचार्या व सेक्रेटरी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या, शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्या, राज्य शासनाच्या तेजस्विनी महिला आश्रमामध्ये शिक्षणतज्ज्ञ व महिला कल्याण समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांना आदर्श महिला पुरस्कार, राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार, आधुनिक सावित्री पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सेमीनार मध्ये आपले शैक्षणिक विचारांसोबत कृतीशील आराखडा सादर केला.
त्यांच्या पश्चात आई, वडील, बहिण, पती, दोन मुले, सासू, सुन असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार दिनांक 02.05.2026 रोजी सकाळी 9.00 वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथो होणार आहे.
#भावपूर्णश्रद्धांजली
#Shraddhanjali
#RIP
#शुभांगीगावडे
#ShubhangiGavde
#शिक्षणक्षेत्र
#EducationLeader
#BreakingNews
#मराठीबातम्या
#MaharashtraNews
#Kolhapur

5 months ago | [YT] | 11