नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा होणार मात्र अनावश्यक वापराला महापालिका घालणार आळा
शासनाच्या निर्देशानुसार अहिल्यानगर शहरात पाणी वापराचे सूक्ष्म नियोजन; आयुक्त यशवंत डांगे यांची माहिती
अहिल्यानगर : राज्यातील कमी पर्जन्यमान, संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात किमान १० टक्के पाणी कपात लागू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. मात्र, नागरिकांना आवश्यक पाणी मिळावे यासाठी सध्या सुरू असलेल्या दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणापासून शहरापर्यंतच्या जलवाहिनीमध्ये कुठेही गळती राहणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे. तसेच शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेतील लिकेज शोधून ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. पाणीपुरवठा करताना होणारी गळती आणि अनावश्यक पाणी वापर कमी करून उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
शहरातील वाहन धुण्याच्या केंद्रांमध्ये महापालिकेच्या पाण्याचा वापर होऊ नये, यासाठी वॉशिंग सेंटरची तपासणी करून आवश्यक आदेश दिले जाणार आहेत. उद्याने, रस्ते, बांधकामे तसेच अन्य कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापरावर बंदी केली जाणार आहे. अशा कामांसाठी बोअरवेलचे पाणी, प्रक्रिया केलेले सांडपाणी किंवा पुनर्वापरयोग्य पाण्याचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. ....
नळांना तोट्या आवश्यक कनेक्शनची तपासणी होणार
महापालिकेच्या सर्व पाणी कनेक्शनना सक्तीने तोट्या बसविण्याचे आदेश दिले जाणार आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या पथकांकडून त्याची तपासणीही केली जाणार आहे. नळ सुरू राहिल्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय, टाक्या ओसंडून वाहणे किंवा पाइपलाइनमधील गळती यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जाणार आहे. ......
गरजेपुरतेच धरणातून पाणी उचलणार
मुळा धरणातील उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी भविष्यात शहराला आवश्यक तेवढेच पाणी धरणातून उचलण्याचे नियोजन केले जाणार आहे. मागणी आणि उपलब्ध साठा यांचा नियमित आढावा घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाईल. त्यामुळे सध्या पुरवठ्याच्या वेळेत बदल न करता अनावश्यक पाणी वापरावर नियंत्रण आणण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. ......
नागरिकांचे प्रबोधन
पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. घरातील नळ सुरू ठेवणे, टाक्या ओसंडून वाहू देणे, वाहन व अंगण धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणे, पाण्याचा अनावश्यक वापर करणे आदी प्रकार टाळण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना आणि सार्वजनिक ठिकाणीही पाणी बचतीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे. ...... शासनाच्या निर्देशानुसार शहरातील उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळेत सध्या कोणताही बदल केला जाणार नाही. नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा केला जाईल; मात्र अनावश्यक वापराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील. असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. ......
पाणी बचतीसाठी महापालिकेचा ‘ॲक्शन प्लॅन’
धरण ते शहर जलवाहिनीतील गळतीवर नियंत्रण पिंपळगाव माळवी येथील अवैध पाणी उपस्यावर कार्यवाही करणे
अंतर्गत वितरण व्यवस्थेतील लिकेज तातडीने दुरुस्त
शहरातील सर्व महापालिका कनेक्शनना तोट्या बसविण्याची सक्ती
सर्व व्हाल्व्ह मन यांना स्पॉटवर थांबण्याचे आदेश
वॉशिंग सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वापरावर नियंत्रण बांधकाम, रस्ते व उद्यानांसाठी पर्यायी पाण्याचा वापर
मनपा पाणी टँकर वाहतूक मध्ये होणारी गळती टाळणे
सोसायट्यांमध्ये टाक्या ओसंडून वाहण्यास प्रतिबंध पाणी बचतीबाबत नागरिकांचे प्रबोधन
हॉटेल लॉजिंग व्यवसायिक यांचा पाणी वापर तपासून पिण्याचा पाण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी पर्यायी विहीर / इंधन विहीरचे पाणी वापराने
🧹 स्वच्छतेसाठी हात पुढे… स्वच्छ शहरासाठी संकल्प पुढे!
बुधवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
रस्ते व सार्वजनिक परिसरातील झाडूने सहज न उचलता येणारे प्लास्टिकचे तुकडे, कागद, पिशव्या तसेच इतर छोटा कचरा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वतः हाताने गोळा करून कचरा संकलित केला. संकलित कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
स्वच्छता कर्मचारी केवळ झाडू मारत नाहीत, तर शहरातील प्रत्येक कण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्यक्ष श्रम घेत आहेत. त्यांच्या या सेवाभावाला नागरिकांनीही सहकार्य करून कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता योग्य कचरापेटीतच टाकावा.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव देवी परिसराची महापौर, आयुक्तांकडून पाहणी
स्वच्छता, पाणी, विद्युत व्यवस्था, रस्ते, मोकाट कुत्रे, जनावरे व अतिक्रमणांबाबत तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना
भाविकांनी कायनेटिक चौक-मोहिनीनगर रेल्वे भुयारी मार्गाचा वापर करावा - महापौर ज्योतीताई गाडे
अहिल्यानगर : नवरात्रोत्सवाचा सण जवळ आला असून, केडगाव देवी मंदिर परिसरात दर्शनासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापौर ज्योतीताई गाडे व मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केडगाव देवी परिसराची पाहणी केली. यावेळी स्वच्छता, पाणी, विद्युत व्यवस्था, रस्त्यांचे पॅचिंग, मोकाट कुत्रे, जनावरे, अतिक्रमणे आदी विविध बाबींचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, नगरसेविका कमल कोतकर, नगरसेविका अश्विनी लोंढे यांच्यासह इंजिनिअर महादेव काकडे, श्रीकांत निंबाळकर, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, विद्युत विभाग प्रमुख शांताराम क्षेत्रे आदी उपस्थित होते. महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, केडगाव देवी हे भाविकांचे श्रद्धास्थान असून नवरात्रोत्सवात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या काळात भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध सुविधा व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने आज परिसराची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी झाडूने सहज न उचलता येणारे प्लास्टिकचे तुकडे, कागद, पिशव्या तसेच इतर सूक्ष्म कचरा स्वच्छता कर्मचारी स्वतः हाताने गोळा करून कचरा संकलित करीत आहेत.
गोळा केलेला कचरा योग्य पद्धतीने संकलित करून त्याची पुढील विल्हेवाट लावण्यासाठी कर्मचारी तत्पर आहेत.
स्वच्छता ही केवळ मोहीम नाही, ती शहराप्रती आपली जबाबदारी आहे!
AMC Nagar
🚰 अनधिकृत नळ कनेक्शनला आळा! 🚫
पाणीपुरवठा व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकाची कठोर कारवाई सुरू आहे.
💧 नियम पाळा, पाणी वाचवा!
शाश्वत आणि सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी सहकार्य करा. 🙏
#WaterConservation #AMC #Amccommissioner
3 hours ago | [YT] | 1
View 0 replies
AMC Nagar
💧 आजची पाणी बचत, उद्याची जलसुरक्षा!
पाणी जपा, पाण्याचा योग्य वापर करा आणि जलस्रोतांचे संरक्षण करा. 🌿💦
#WaterConservation #SaveWater #EveryDropCounts #AMC #AMCCommissioner
8 hours ago | [YT] | 0
View 0 replies
AMC Nagar
माध्यमांच्या दृष्टिक्षेपातून… 👀
#epaper #news #ahilyanagar #amc #amccommissioner 📰
8 hours ago | [YT] | 0
View 0 replies
AMC Nagar
नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा होणार मात्र
अनावश्यक वापराला महापालिका घालणार आळा
शासनाच्या निर्देशानुसार अहिल्यानगर शहरात पाणी वापराचे सूक्ष्म नियोजन; आयुक्त यशवंत डांगे यांची माहिती
अहिल्यानगर : राज्यातील कमी पर्जन्यमान, संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात किमान १० टक्के पाणी कपात लागू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. मात्र, नागरिकांना आवश्यक पाणी मिळावे यासाठी सध्या सुरू असलेल्या दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणापासून शहरापर्यंतच्या जलवाहिनीमध्ये कुठेही गळती राहणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे. तसेच शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेतील लिकेज शोधून ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. पाणीपुरवठा करताना होणारी गळती आणि अनावश्यक पाणी वापर कमी करून उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
शहरातील वाहन धुण्याच्या केंद्रांमध्ये महापालिकेच्या पाण्याचा वापर होऊ नये, यासाठी वॉशिंग सेंटरची तपासणी करून आवश्यक आदेश दिले जाणार आहेत. उद्याने, रस्ते, बांधकामे तसेच अन्य कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापरावर बंदी केली जाणार आहे.
अशा कामांसाठी बोअरवेलचे पाणी, प्रक्रिया केलेले सांडपाणी किंवा पुनर्वापरयोग्य पाण्याचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.
....
नळांना तोट्या आवश्यक
कनेक्शनची तपासणी होणार
महापालिकेच्या सर्व पाणी कनेक्शनना सक्तीने तोट्या बसविण्याचे आदेश दिले जाणार आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या पथकांकडून त्याची तपासणीही केली जाणार आहे. नळ सुरू राहिल्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय, टाक्या ओसंडून वाहणे किंवा पाइपलाइनमधील गळती यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जाणार आहे.
......
गरजेपुरतेच धरणातून
पाणी उचलणार
मुळा धरणातील उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी भविष्यात शहराला आवश्यक तेवढेच पाणी धरणातून उचलण्याचे नियोजन केले जाणार आहे. मागणी आणि उपलब्ध साठा यांचा नियमित आढावा घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाईल. त्यामुळे सध्या पुरवठ्याच्या वेळेत बदल न करता अनावश्यक पाणी वापरावर नियंत्रण आणण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे.
......
नागरिकांचे प्रबोधन
पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. घरातील नळ सुरू ठेवणे, टाक्या ओसंडून वाहू देणे, वाहन व अंगण धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणे, पाण्याचा अनावश्यक वापर करणे आदी प्रकार टाळण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना आणि सार्वजनिक ठिकाणीही पाणी बचतीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे.
......
शासनाच्या निर्देशानुसार शहरातील उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळेत सध्या कोणताही बदल केला जाणार नाही. नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा केला जाईल; मात्र अनावश्यक वापराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील. असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
......
पाणी बचतीसाठी महापालिकेचा ‘ॲक्शन प्लॅन’
धरण ते शहर जलवाहिनीतील गळतीवर नियंत्रण
पिंपळगाव माळवी येथील अवैध पाणी उपस्यावर कार्यवाही करणे
अंतर्गत वितरण व्यवस्थेतील लिकेज तातडीने दुरुस्त
शहरातील सर्व महापालिका कनेक्शनना तोट्या बसविण्याची सक्ती
सर्व व्हाल्व्ह मन यांना स्पॉटवर थांबण्याचे आदेश
वॉशिंग सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वापरावर नियंत्रण
बांधकाम, रस्ते व उद्यानांसाठी पर्यायी पाण्याचा वापर
मनपा पाणी टँकर वाहतूक मध्ये होणारी गळती टाळणे
सोसायट्यांमध्ये टाक्या ओसंडून वाहण्यास प्रतिबंध
पाणी बचतीबाबत नागरिकांचे प्रबोधन
हॉटेल लॉजिंग व्यवसायिक यांचा पाणी वापर तपासून पिण्याचा पाण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी
पर्यायी विहीर / इंधन विहीरचे पाणी वापराने
मुळा धरणातून गरजेपुरतेच पाणी उचलण्याचे नियोजन
#amc #amccommissioner #water
23 hours ago | [YT] | 1
View 0 replies
AMC Nagar
🧹 स्वच्छतेसाठी हात पुढे… स्वच्छ शहरासाठी संकल्प पुढे!
बुधवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
रस्ते व सार्वजनिक परिसरातील झाडूने सहज न उचलता येणारे प्लास्टिकचे तुकडे, कागद, पिशव्या तसेच इतर छोटा कचरा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वतः हाताने गोळा करून कचरा संकलित केला. संकलित कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
स्वच्छता कर्मचारी केवळ झाडू मारत नाहीत, तर शहरातील प्रत्येक कण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्यक्ष श्रम घेत आहेत. त्यांच्या या सेवाभावाला नागरिकांनीही सहकार्य करून कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता योग्य कचरापेटीतच टाकावा.
स्वच्छ अहिल्यानगर सुंदर अहिल्यानगर!
#Amc #Amccommissioner #SwachhAhilyanagar #CleanAhilyanagar #SolidWasteManagement
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
AMC Nagar
माध्यमांच्या दृष्टिक्षेपातून… 👀
#epaper #news #ahilyanagar #amc #amccommissioner 📰
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
AMC Nagar
माध्यमांच्या दृष्टिक्षेपातून… 👀
#epaper #news #ahilyanagar #amc #amccommissioner 📰
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
AMC Nagar
📢 व्यवसाय परवाना नूतनीकरणासाठी महत्त्वाचे आवाहन
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सर्व व्यवसाय धारकांनी आपला व्यवसाय परवाना वेळेत नूतनीकरण करून महानगरपालिकेच्या नियमांचे पालन करावे.
💻 व्यवसाय परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया आता ऑनलाइन व सुलभ!
📅 अंतिम मुदत : ३१ डिसेंबर २०२६
परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे आजच ऑनलाइन अर्ज करून परवाना नूतनीकरण पूर्ण करा आणि दंडात्मक कारवाई टाळा.
नियमांचे पालन • व्यवसायाची सुरक्षितता • शहराच्या सुव्यवस्थेसाठी सहकार्य
#AMC #Amccommissioner #BusinessLicense #LicenseRenewal #NirantarNagarseva
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
AMC Nagar
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव देवी परिसराची महापौर, आयुक्तांकडून पाहणी
स्वच्छता, पाणी, विद्युत व्यवस्था, रस्ते, मोकाट कुत्रे, जनावरे व अतिक्रमणांबाबत तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना
भाविकांनी कायनेटिक चौक-मोहिनीनगर रेल्वे भुयारी मार्गाचा वापर करावा - महापौर ज्योतीताई गाडे
अहिल्यानगर : नवरात्रोत्सवाचा सण जवळ आला असून, केडगाव देवी मंदिर परिसरात दर्शनासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापौर ज्योतीताई गाडे व मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केडगाव देवी परिसराची पाहणी केली. यावेळी स्वच्छता, पाणी, विद्युत व्यवस्था, रस्त्यांचे पॅचिंग, मोकाट कुत्रे, जनावरे, अतिक्रमणे आदी विविध बाबींचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, नगरसेविका कमल कोतकर, नगरसेविका अश्विनी लोंढे यांच्यासह इंजिनिअर महादेव काकडे, श्रीकांत निंबाळकर, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, विद्युत विभाग प्रमुख शांताराम क्षेत्रे आदी उपस्थित होते.
महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, केडगाव देवी हे भाविकांचे श्रद्धास्थान असून नवरात्रोत्सवात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या काळात भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध सुविधा व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने आज परिसराची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
#amc #amccommissioner
1 day ago | [YT] | 2
View 0 replies
AMC Nagar
🧹 स्वच्छतेसाठी हात पुढे स्वच्छ अहिल्यानगरसाठी संकल्प दृढ!
“झाडूच्या पलीकडेही स्वच्छतेची जबाबदारी…
हातांनी उचलला कचरा, शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार!”
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी झाडूने सहज न उचलता येणारे प्लास्टिकचे तुकडे, कागद, पिशव्या तसेच इतर सूक्ष्म कचरा स्वच्छता कर्मचारी स्वतः हाताने गोळा करून कचरा संकलित करीत आहेत.
गोळा केलेला कचरा योग्य पद्धतीने संकलित करून त्याची पुढील विल्हेवाट लावण्यासाठी कर्मचारी तत्पर आहेत.
स्वच्छता ही केवळ मोहीम नाही,
ती शहराप्रती आपली जबाबदारी आहे!
#Amc #Amccommissioner #SwachhAhilyanagar #CleanAhilyanagar #Swachhata
3 days ago | [YT] | 2
View 0 replies
Load more