View Shri Maskar Maharaj Shegaon Abhang in our Youtube Channel Shegaon Niwasi On Shri Gajanan Maharaj Palkhi Sohala Shegaon.
शेगाव निवासी (Official ) या Youtube चॅनेल वर आपले स्वागत आहे..
🚩श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यातील, ह.भ.प. मास्कर महाराज यांच्या आवाजाततील सुप्रसिद्ध अभंग शेगाव निवासी या चॅनेल वर आपल्याला मिळतील.
Facebook Page - 👉Join On Facebook Page - m.facebook.com/Shegaon-Niwasi-104364764893264/
For Contact - influencebajar@gmail.com
Shegaon Niwasi
श्रींच्या पालखी सोहळ्याचा पायदळ प्रवास शेगांव ते श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत ७५० किलोमीटर आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगांव पर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमिटर आहे. असा एकूण प्रवास १३०० किलोमीटरचा आहे.
प्रवासात असणाया सोई :- 🏹
श्रींचे पालखी सोबत प्रवास करताना वारकऱ्यांची दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे वाटेने चहापाणी व फराळाची व्यवस्था सुध्दा श्रींच्या भक्तांकडून केल्या जाते. रात्रीचे मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगलकार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. सकाळी स्नानाकरिता पाण्याची व्यवस्था असते. काही ठिकाणी भक्त आपआपल्या परिने वारकरी मंडळीची सेवार्थ व्यवस्था करतात.
वाटेत भेटणाया वारकरी दिंड्यांची सेवा :-
श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीसाठी इतरही भजनी दिंड्या पायी जात असतात. वाटेने भेटणाया दिंड्यातील पुरुष-महिला, मुले-मुली इत्यादी वारकयांना संस्थानकडून कपडे वितरित करण्यात येतात. तसेच प्रत्येक दिंडीतील प्रमुख, चोपदार, वीणेकरी यांचा कापड प्रसादासह सत्कार करण्यात येतो.
पंढरीच्या मार्गावर भेटणाया दिंडीतील वारकरी मंडळीना आवश्यकतेनुसार औषध-इंजेक्शन💉 सलाईन देवून सेवार्थ औषधोपचार💊 करण्यात येतो. त्याच प्रमाणे पिण्याच्या☕️🥛 पाण्याकरिता टँकरची व्यवस्था केलेली असते.
संपूर्ण महाराष्ट्रामधून श्री क्षेत्र पंढरपूरला🌺 बहूतेक सर्व संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात आणि वारकरी सांप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने श्री गजानन महाराज संस्थानने १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी व श्री क्षेत्र आळंदीला मोटारीने पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. याशिवाय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र पैठण, श्री क्षेत्र मुक्ताईनगर या ठिकाणी देखील संस्थानची वारी निमित्त पालखी जात आहे. आषाढी वारिकरीता पंढरपूरला जाताना वारकरी दरवर्षी सोबत निघतात. दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्त्वांचा लोकांना बोध होतो व आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन धर्माप्रती श्रध्दा व भावना वृध्दिंगत होतात. तसेच लोकजीवनावर आध्यात्मिकतेचा प्रभाव पडण्यास मदत होते. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत. या गावांमध्ये हरीनामाचा प्रसार करून तेथील ग्रामस्थांचे जीवन (आयुष्य) सुखकर करणे, तेथील व्यसनाधिनता, अंधश्रध्दा दूर करणे हे या वारीमागचे आणखी एक कारण. संस्थानचे पायी वारीकरीता श्री महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागीर आणून तयार करून घेतली आहे. त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलापूर्ण असून ही पालखी पाहाताक्षणीच अंत:करणातील भक्तिभाव उंचबळून येतात.
श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूरला जातांना खालील तीर्थक्षेत्रावरून जाते.
श्री क्षेत्र नागझरी- श्री क्षेत्र डव्हा-श्री क्षेत्र शिरपूर जैन- श्री क्षेत्र नरसी नामदेव-श्री क्षेत्र औंढा नागनाथ-श्री क्षेत्र त्रीधारा- श्री क्षेत्र गंगाखेड- श्री क्षेत्र परळी वैजनाथ- श्री क्षेत्र अंबाजोगाई- श्री क्षेत्र तेर-श्री क्षेत्र तुळजापूर-श्री क्षेत्र सोलापूर- श्री क्षेत्र माचनुर- श्री क्षेत्र मंगळवेढा- श्री क्षेत्र पंढरपूर.
श्रींच्या पालखीचा परतीचा मार्ग :-
श्री क्षेत्र अरण मार्गे कुर्मदास- श्री क्षेत्र बार्शी (भगवान) - श्री क्षेत्र कुंथलगिरी- श्री क्षेत्र कपीलधारा- शहागड-जालना-न्हावा-सिंदखेड राजा-लोणार-मेहकर-खामगांव-शेगांव.
स्वागत :-
श्रींचे पालखीचे स्वागताकरिता गावांतील भजनी मंडळी, बँड पथक, महिला मंडळ तुलसी वृदांवनासह येतात. मिरवणुकीचे मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढलेल्या असतात. स्वागताच्या कमानी उभारल्या जातात. तसेच पुष्प वर्षाव केल्या जातो.
श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना चहापाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केलेली असते. तसेच श्रींच्या पालखीचे गावांतील नागरीकांकडून श्री महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत केल्या जाते.
facebook.com/297305239535835
3 years ago | [YT] | 28
View 2 replies
Shegaon Niwasi
वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.
“गण गण गणात बोते” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.
कुत्रा, गाय, घोडा ह्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी सोदाहरण दाखविले. भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले. महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले. अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले. श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करावा, महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे.
4 years ago | [YT] | 30
View 1 reply
Shegaon Niwasi
|| गुरु गजानन नमो नमः ||
4 years ago | [YT] | 27
View 0 replies
Shegaon Niwasi
अंगावर एक मळके कापड, पाणी प्यायचे पात्र म्हणून एक भोपळा, आणि हातात एक चिलम, अश्या अवस्थेत गजानन महाराज मठाबाहेर बसलेले असता, बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी हे पातुरकरांच्या मठाजवळून जात असताना गजानन महाराजांचे दिगंबर अवस्थेतील रूप त्यांच्या दृष्टीस पडले.
त्यानंतर त्यांना कळेनासे झाले कि कोण हा अज्ञात व्यक्ती आहे, जो उष्ट्या पत्रावळी वरील शिते वेचून खात आहे.
त्यांच्या मनी अशी जाणीव झाली कि हा जर उपाशी व्यक्ती असता तर देविदास पातुरकरांकडे याने अन्नाची मागणी केली असती आणि पातुरकर एवढे सज्जन व्यक्ती तर आहेतच कि त्यांनी याची मदत सुद्धा केली असती. परंतु हा कोणी उपाशी व्यक्ती तर दिसत नाही, त्यांच्या मनात त्या व्यक्तीला जाणण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली,
त्यासाठी बंकटलाल पुढे होऊन विचारू लागले, आपणास भूक लागली असेल तर आम्ही आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था करू शकतो. त्यावर कोणतेही उत्तर न देता त्या अवलीयांनी फक्त वरती पाहिले. आणि पुन्हा पत्रवाळीवर शिते शोधू लागले.
त्यांनतर बंकटलालने त्या अवलियासाठी देविदास पातुरकरांच्या घरून जेवणाची व्यवस्था केली. पण सर्व जेवणाचे कालवण करून कोणत्याही प्रकारची चव न घेता त्या अवलियांनी जेवणाचा स्वीकार केला, तोच दामोदरपंत पाण्याचा तांब्या भरून येईपर्यंत त्या अवलीयांनी जवळच असलेल्या गुरांच्या पिण्याचे पाणी पित आपल्या जेवणाची समाप्ती केली.
तसेच दामोदरपंत यांनी भरून आणलेल्या तांब्याला पुढे करत दामोदरपंत म्हणाले कि मी आपल्यासाठी निर्मळ, गार, पाणी आणले आहे, त्यावर महाराजांनी त्यांना उत्तर देतांना काढलेले हे शब्द,
हें अवघें चराचर।
ब्रम्हे व्याप्त साचार।
तेथें गढुळ, निर्मळ वसित नीर।
हे न भेद राहिले।
याचा अर्थ असा कि पूर्ण चराचरामध्ये तो भगवंत वास करतो, मग गढूळ आणि निर्मळ पाण्यामध्ये काय फरक करावा.
असे सांगत तेथून गजानन महाराज वाऱ्याच्या वेगाने चालत निघून गेले, त्यांनतर बंकटा ला घरी गेल्यानंतर हुरहूर वाटू लागले, पुन्हा त्या समर्थाची भेट व्हावी हि इच्छा मनी निर्माण झाली. त्यांनी पूर्ण शेगांव शोधले तरीही महाराजांचा शोध काही लागला नाही.
4 years ago | [YT] | 32
View 0 replies
Shegaon Niwasi
माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी घेतले श्री चे दर्शन.
4 years ago | [YT] | 21
View 0 replies
Shegaon Niwasi
4 years ago | [YT] | 43
View 0 replies
Shegaon Niwasi
आजपासुन श्री संत गजानन महाराजांचे मंदिर दर्शना करिता सर्व वयोगटातील भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. आता दर्सना करिता ईपास काढण्याची गरज नाही.
4 years ago (edited) | [YT] | 46
View 3 replies
Shegaon Niwasi
श्री राम नवमी पालखी सोहळा शेगाव 2022
4 years ago | [YT] | 3
View 0 replies
Shegaon Niwasi
ज्ञानोबा माऊली तुकाराम ' स्वर : श्री मास्कर महाराज (हेडफोन लावुन ऐका )
4 years ago | [YT] | 4
View 0 replies
Load more