Swami Makarandnath, Pune

सद्गुरू पू स्वामी मकरंदनाथ हे आदिनाथ श्रीशंकरांपासून ज्ञानेश्वरमहाराज आणि पुढे पावसचे स्वामी स्वरूपानंद व पुणे येथील पू स्वामी माधवनाथांपर्यंत चालत आलेल्या नाथसंप्रदायाचे सांप्रत अध्वर्यू आहेत.
पुणेस्थित स्वामी मकरंदनाथ हे राजयोगप्रणीत सोSहम् ध्यानसाधनेचे अंतरंग मार्गदर्शक असून सोSहं ध्यानाचे अनुग्रह देतात.ते 1996 सालापासून नियमितपणे पारमार्थिक विचारांचे प्रबोधन भगवद्गीता,ज्ञानेश्वरी,दासबोध ह्या ग्रंथांच्या आधारे पुण्यामध्ये ध्यानमंदिरात तसेच ग्रंथ लेखनाच्या आधारे करतात.पुण्याजवळ भूगावजवळील साधकाश्रमात स्वामीजी साधना शिबिरे घेतात.सुशिक्षित,तरुणवर्गामध्ये ध्याननामादि साधना शिकवून समाज घडविण्याचे कार्य ते अव्याहतपणे करीत आहेत.प्रपंच व परमार्थ एकरूप करून धन्यतेचे जीवन जगता येते हा आदर्श वस्तुपाठ स्वतः आचरून ते समाजाला देत आहेत.
स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ ह्या संस्थांच्या माध्यमातून स्वामीजी परमार्थाचा प्रचार-प्रसाराचे कार्य पुणे तसेच देश,परदेशात करीत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा:

मंदार वझे - 9545388686
केदार वझे - 9730578029


Swami Makarandnath, Pune

श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाशिबिर, १ ते ८ जून २०२५ ह्या कालावधीत, गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला आपण अवश्य उपस्थित रहावे.

1 year ago (edited) | [YT] | 38

Swami Makarandnath, Pune

श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा - ६८ वा आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा - ४८ वा वर्धापन दिन उत्सव आपण संयुक्तरित्या दिनांक ०१ फेब्रुवारीला बालगंधर्व रंगमंदिर येथे, सकाळी ९ ते ११ या वेळेत साजरा करणार आहोत. या कार्यक्रमाला आपण अवश्य उपस्थित रहावे ही विनंती .

1 year ago | [YT] | 27

Swami Makarandnath, Pune

प. पू. स्वामी माधवनाथ जयंती उत्सव २०२४


रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४, सकाळी 8 वाजता गणेशपुरम ध्यानमंदिर

2 years ago (edited) | [YT] | 37

Swami Makarandnath, Pune

स्वामी मकरंदनाथ विरचित अभंग ग्रंथ प्रकाशन

रविवार दिनांक 19 मे 2024, सकाळी 8 वाजता गणेशपुरम ध्यानमंदिर

2 years ago | [YT] | 24

Swami Makarandnath, Pune

उत्तराधिकार प्रदान दिन 22 ऑक्टोबर 2023 सकाळी 8 ते 10

2 years ago (edited) | [YT] | 24