पायवाटेचं एक बरं असतं , ह्या वाटेवर मैलाचे दगड नसतात. त्यामुळे किती वाट चाललो किती बाकी आहे याचे गणित करत न बसता आपल्याला आजूबाजूच्या अलौकिक निसर्गाला न्याहाळत मार्गक्रमण करायला मिळते.
काही पायवाटा कायमच्या पुसल्या गेल्या आहेत काही आज शेवटच्या घटका मोजत आहेत. काही मात्र आजही ताज्या आहेत..
याच पायवाटांना पुन्हा पावलांचा स्पर्श करण्यासाठी ....फिरणार आहे.
Instagram ID :
instagram.com/paayvata
Facebook ID :
facbook.com/PaayvataYTChannel
E Mail Id :
paayvata@gmail.com
Paayvata
आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि आनंदाची रोषणाई सदैव राहो…
आपल्या संपूर्ण पायवाटा परिवाराला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔❤️
#payvata #diwali #diwali2026 #festival
1 day ago (edited) | [YT] | 77
View 24 replies
Paayvata
नवीन व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/d28h_qEgDKQ
एका शिक्षकाने जाता जाता सर्व गावाला रडवले 😢
शिक्षक म्हणजे केवळ शाळेत शिकवणारी व्यक्ती नसते, तर अनेकांच्या आयुष्याला आकार देणारा एक माणूस असतो. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात शिक्षकाची भूमिका ही केवळ शिक्षणापुरती मर्यादित नसते. तो त्या गावाचा मार्गदर्शक असतो, मुलांच्या स्वप्नांना बळ देणारा असतो आणि गावाला आधुनिक जगाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असतो.
आज सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अतिदुर्गम कोळणे गावात अशाच एका शिक्षकाला निरोप देताना संपूर्ण गावाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या सरांच्या बदलीमुळे भावुक झाले होते.
गावातील माता-भगिनींनी सरांना प्रेमाने जवळ घेतलं, कुणी गळाभेट दिली, कुणी मायेने त्यांच्या गालावर मुके घेतले. तो क्षण पाहताना मन हेलावून गेलं.
खरं तर एखाद्या माणसाच्या निरोपासाठी संपूर्ण गावाच्या डोळ्यांत अश्रू येणं, यापेक्षा मोठं सन्मानाचं प्रमाणपत्र दुसरं कोणतं असू शकतं?
आजच्या काळात माणसं मोठी होण्यासाठी अनेक पदव्या मिळवतात, मोठमोठी पदं मिळवतात; पण एखाद्या गावाच्या माणसांच्या मनात कायमचं घर करणं ही खऱ्या अर्थाने मिळवलेली संपत्ती असते.
व्हिडिओ नक्की बघा 🙏🏻😊
#payvata #payvatachannel #पायवाटा
2 days ago | [YT] | 139
View 1 reply
Paayvata
आज मला अतिशय आनंदाने सांगावेसे वाटते की, आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण बंद होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या सातारा जिल्ह्यातील, पाटण तालुक्यात असलेल्या अतिदुर्गम अशा पाथरपुंज गावातील जिल्हा परिषद शाळेला वाचवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
या शाळेत सध्या अवघी चार मुले शिक्षण घेत आहेत. त्यातील तीन विद्यार्थी हे एकाच कुटुंबातील असून त्या घरातील कर्त्या पुरुषाचे नुकतेच निधन झाल्याचे समजले. शिवाय अतिदुर्गम, अति वृष्टीच्या या भागात रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने ते कुटुंब स्थलांतराच्या वाटेवर होते. हे कुटुंब जर स्थलांतरित झाले असते तर विद्यार्थी संख्ये अभावी ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती.
ही माहिती पाथरपुंज शाळेचे अतिशय क्रियाशील मुख्याध्यापक श्री. अजय कोतकर सर आणि त्यांचे सहकारी आप्पा आर्डे सर यांनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती. ही शाळा जर बंद झाली असती, तर केवळ चार मुलांची शाळा बंद झाली नसती, तर त्यांच्या शिक्षणाचा एक महत्त्वाचा आधारही हिरावला गेला असता.
याच सर्व बाबींचा विचार करून आपण एक छोटासा, पण दूरगामी परिणाम घडवणारा निर्णय घेतला आहे.
या शाळेतील चारही मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या पालकांना थोडासा आर्थिक आधार म्हणून आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दर महिन्याला, या चारही मुलांच्या पालकांच्या बँक खात्यात एक ठरावीक आर्थिक मदत जमा करणार आहोत याची सुरुवात देखील आज त्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून मी केली आहे. सोबत या दोनही कुटुंबांना किराणा आणि दिवाळी साहित्य देखील दिले..जेणेकरून मुलांच्या शिक्षणाला आर्थिक अडचणींचा अडथळा येऊ नये आणि पालकांनाही मुलांना याच शाळेत शिकवण्यासाठी आधार मिळावा आणि ही शाळा वाचावी..
कदाचित एखादी शाळा वाचवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देऊन अशा पद्धतीने मराठी शाळा वाचवण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयत्न असावा.
मला माहीत नाही, या प्रयत्नातून भविष्यात किती मोठा बदल घडेल. पण आज या चार मुलांच्या आयुष्यात शिक्षणाची एक वाट निरंतर सुरू राहणार आहे आणि यापेक्षा मोठे समाधान दुसरे काय असू शकते?
आज आपल्या पायवाटा या यूट्यूब चॅनेलमुळे चार मुलांची शाळा सुरू राहणार आहे, ही केवळ माझी नाही, तर आपल्या संपूर्ण पायवाटा परिवाराची उपलब्धी आहे.
माझे स्वप्न आहे की, दुर्गम भागातील कोणतेही मूल केवळ गरिबीमुळे किंवा परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये.
शाळा वाचली पाहिजे, शिक्षण टिकले पाहिजे आणि मुलांच्या स्वप्नांना जगण्याची संधी मिळाली पाहिजे!
या कामात मला आपल्या अनेक मान्यवर सब्सक्राइबर मंडळींनी मदतीचा हात दिला आहे.
त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
आज पुन्हा एकदा जाणवले की, समाजमाध्यमांचा वापर केवळ मनोरंजनासाठीच नाही, तर एखाद्याचे आयुष्य बदलण्यासाठीही होऊ शकतो.
ही तर सुरुवात आहे… मी या पायवाटांवरून आता केवळ गावोगावी फिरणार नाही, तर अशा मुलांच्या, माणसांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठीही प्रयत्नशील राहणार आहे.
कारण रस्ते शोधताना आपल्याला अनेकदा अशा दुर्लक्षित आणि अपरिचित आयुष्यांच्या, पायवाटाही सापडतात…!
लवकरच या भेटीचा व्हिडिओ आपल्या चॅनल वर प्रदर्शित होईल, नक्की बघा 🙏🏻😊
महेश धिंडले
पायवाटा यूट्यूब चॅनल
#payvata #payvatachannel
6 days ago | [YT] | 595
View 73 replies
Paayvata
पुन्हा एकदा सातारा जिल्हा, पाटण तालुक्यातील पाथरपुंज तसेच काही नवीन गावांच्या, शाळांच्या आणि अनोळखी पायवाटांच्या शोधात निघालो आहे.
काही चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी, त्यांच्या स्वप्नांना थोडासा आधार देण्यासाठी आणि आपल्या माणसांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण पेरण्यासाठी…
आज एक जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी भरल्या हाताने जात आहे.
कारण माझ्यासाठी हा प्रवास केवळ भटकंती नाही, तर माणसं जोडण्याचा, त्यांचं जगणं समजून घेण्याचा आणि जमेल तिथे आपल्या परीने मदत करण्याचा, माणुसकी जपण्याचा एक छोटासा प्रयत्न असणार आहे.
#payvata #maheshdhindle #payvatachannel
1 week ago | [YT] | 319
View 8 replies
Paayvata
नवीन व्हिडिओ, लिंक 👇🏻 नक्की बघा 😊
https://youtu.be/ELQle8GxlDs
वेल्हे तालुक्यातील चापेट धरणाच्या शेजारी, उंच डोंगराच्या उतारावर कातकरी समाजातील चार-पाच कुटुंबं आपला संसार थाटून राहत आहेत.
या कुटुंबांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या गरजेच्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यातून किराणा साहित्य घेऊन गेलो होतो.
हातावर पोट असणारा हा समाज. रोजच्या भाकरीसाठी धडपड करताना अनेक कुटुंबांना आजही आपल्या मूलभूत गरजांसाठीही खुप संघर्ष करावा लागतो.
निसर्गाच्या सानिध्यात जगणाऱ्या या समाजाने निसर्गाशी जुळवून घेण्याची जीवनपद्धत आजही जपली आहे.
आपण आपल्या परीने केलेली छोटीशी मदत त्यांच्या सर्व समस्या सोडवू शकणार नाही, पण त्यांच्या जगण्याला थोडासा आधार नक्कीच देऊ शकते.
#payvata #payvatachannel
3 weeks ago | [YT] | 446
View 7 replies
Paayvata
नवीन व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/ELQle8GxlDs
या हिरव्यागार सौंदर्यामागे कितीतरी वेदना
मुक्याने जगत असतात…
#payvata #paayvata
3 weeks ago (edited) | [YT] | 336
View 6 replies
Paayvata
नवीन व्हिडिओ लिंक👇🏻नक्की बघा 😊
https://youtu.be/rvfRY_Qd7wo
4 weeks ago | [YT] | 309
View 3 replies
Paayvata
नवीन व्हिडिओ लिंक👇🏻
https://youtu.be/LTTW-lFlD0I
1 month ago | [YT] | 365
View 4 replies
Paayvata
धन्यवाद 🙏🏻
आदरणीय अमोलजी आढळकर सर 😊❤️
1 month ago | [YT] | 574
View 19 replies
Paayvata
विशाल वृक्षांची वाढ जशी अगदी शांत आणि निशब्दपणे होते,
तसाच माणसाचा खरा विस्तार आणि पूर्णता ही स्वतःला शांततेत समर्पित करण्यात असते.
आपल्या कर्तव्याची सीमा ओळखून
आपण आपले कार्य शांतपणे करत रहायचे…
#payvata #viralpost #raireshwar #maheshdhindle
1 month ago | [YT] | 346
View 7 replies
Load more