Seva Janshakti Party Official

सेवा जनशक्ती पार्टीचे अधिकृत युटुब चॅनल
सेवा जनशक्ती पार्टी च्या बहुजन हिताच्या कार्याची संघर्ष लढे व समाजासाठी मिळवलेल्या यशाची माहिती सामाजिक धार्मिक, विविध घडामोडी बाबत ची माहिती विविध समाज उपयोगी योजनांची माहिती
#sevajanshaktiparty #सेवाजनशक्तीपार्टी
#Shivasanghatna #shivasanghatna #shiva #sanghatna #manohardhonde #viral #viralvideo #maharastra #india #mahatmabasaveshwar #manishpandhade #maharashtra
#marathi
#bahujan
#marathaarakshan
#lingayatandbahujan
#sevajanshaktiparti


Seva Janshakti Party Official

शौर्य, स्वाभिमान आणि दहशतमुक्तीचा ऐतिहासिक सोहळा! 🔥🚩
१७ सप्टेंबर: मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि ‘अचलेर मुक्ती दिनाच्या’ सर्व जनतेला क्रांतिकारी शुभेच्छा!
आजचा दिवस फक्त इतिहासाचे पान नाही, तर शिवा संघटनेने अचलेरच्या मातीत घडवलेल्या जिवंत क्रांतीचा गौरवशाली दिवस आहे! नवतरुणांनो आणि नवीन पिढीने हा इतिहास नक्की वाचला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे:
भयावह भूतकाळ: जेव्हा अचलेर दहशतीच्या छायेत होतं...

* एका अंगठा बहादूर गावगुंडाने तब्बल १२ वर्षे अचलेर आणि परिसराला वेठीस धरले होते.
* कोणत्याही आमदार-खासदाराला न जुमानणाऱ्या या गुंडामुळे सर्व समाजावर अमानुष अन्याय होत होता.
* परिस्थिती इतकी भीषण होती की, गावातील लोक मुख्य स्टँडवर यायला घाबरायचे.
* शाळकरी मुले शाळेत जाताना थरथर कापायची आणि तो गावगुंड गावात आला की व्यापारी आपली दुकाने बंद करून भीतीने घरात लपायचे.
* व्यापाऱ्यांकडून उघडपणे खंडणी उकळली जायची; लोक इतके हतबल झाले होते की गाव सोडून जाण्याच्या तयारी होते!

क्रांतीची पहाट: १७ सप्टेंबर २००१...
पण या अन्यायाचा आणि दहशतीचा कायमचा अंत करण्यासाठी मैदानात उतरले ‘शिवा संघटनेचे’ वाघ! शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रा. मनोहर धोंडे सर आणि सोलापूरचे माजी आमदार व राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. शिवशरण अण्णा पाटील बिराजदार यांनी याच दिवशी शिवा संघटनेची स्थापना करून अचलेरमध्ये शड्डू ठोकला!
दोन्ही आदरणीय नेत्यांच्या कणखर आणि पोलादी नेतृत्वाखाली त्या गावगुंडाची दहशत समूळ नष्ट करण्यात आली. ज्या अचलेरमध्ये भीतीने श्वास घेतला जात होता, त्याच अचलेरच्या मूळ रहिवाशांना शिवा संघटनेमुळे पुन्हा स्वतःचा 'स्वाभिमान' आणि हक्क मिळाला!
आजचे अचलेर...
आदरणीय धोंडे सर आणि शिवशरण अण्णा यांच्या असीम संघर्षामुळेच आज आपले अचलेर गाव कोणत्याही भीतीशिवाय अतिशय शांततेत, आनंदात आणि गुण्यागोविंदाने जगत आहे! हा इतिहास नवीन पिढीने कधीही विसरता कामा नये!
अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शिवा संघटनेच्या सर्व वीर योद्ध्यांना आणि क्रांती विचारांना मानाचा मुजरा! 💐🙏
-:: शुभेच्छुक ::-
महांतेश पाटील
सोलापूर जिल्हा सरचिटणीस, शिवा संघटना.

3 weeks ago | [YT] | 10

Seva Janshakti Party Official

🌹 आदरणीय प्रा. मनोहरराव धोंडे सर, सस्नेह 🌹Jay shiva

समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या न्यायाच्या लढ्याला यश मिळवून देण्यासाठी आपण केलेले अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि निःस्वार्थ नेतृत्व आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

अनेकांनी आशा सोडली होती, पण आपण कधीही विश्वास सोडला नाही. प्रत्येक टप्प्यावर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपण संघर्षाला दिशा दिली आणि अखेर न्यायाचा विजय घडवून आणला. हा विजय केवळ प्रशासकीय निर्णय नाही, तर हजारो कुटुंबांच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करणारा ऐतिहासिक क्षण आहे.

आपल्यासारखा मार्गदर्शक, ज्येष्ठ नेता आणि वडिलकीची माया लाभणे, हे आमचे भाग्य आहे. आपल्या नेतृत्वाखाली काम करताना आत्मविश्वास, धैर्य आणि संघर्षाची प्रेरणा सतत मिळत राहिली.

आपल्या या अमूल्य योगदानाबद्दल शब्द अपुरे पडतात. आपण केलेल्या प्रत्येक प्रयत्नाबद्दल आम्ही सदैव ऋणी राहू. ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अशीच समाजसेवेची अखंड ऊर्जा देवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.

आपल्या ऐतिहासिक कार्याला मानाचा मुजरा!


"हौसलों की मिसाल हैं, वफ़ा की पहचान हैं,
धोंडे सर जैसे रहबर, हर कारवाँ की शान हैं।


"आपका एहसान लफ़्ज़ों में बयाँ हो नहीं सकता,
ये रिश्ता सिर्फ़ शुक्रिये से अदा हो नहीं सकता।"



🙏आपलेच कृतज्ञ,
समग्र शिक्षा *संघर्ष समिती टीम.🙏

3 months ago | [YT] | 17