Dattatray Bharane Official

Agriculture Minister-Maharashtra
| Guardian Minister-Washim | MLA-Indapur


Dattatray Bharane Official

घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा

शेती आणि मातीशी नातं जपणाऱ्या प्रत्येक बळीराजाच्या शिवारात सुख-समृद्धी नांदो, शेतात भरघोस पीक बहरो आणि शेतकरी बांधवांच्या कष्टांना यशाची गोड फळं मिळोत, हीच आई भवानीकडे मनापासून प्रार्थना.

शक्ती, भक्ती आणि समृद्धीचा जागर करणाऱ्या या पवित्र नवरात्रोत्सवाच्या आपणांस व आपल्या संपूर्ण परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा.

6 hours ago | [YT] | 0

Dattatray Bharane Official

दुष्काळ पाहणी दौऱ्यानंतर केंद्रीय पथकासोबत महत्त्वपूर्ण बैठक!

📍वर्षा निवासस्थान, मुंबई | दि. ११ ऑक्टोबर २०२६

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्र शासनाच्या आंतरमंत्रालयीन पथकासोबत आज मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत राज्यातील दुष्काळाची सद्यस्थिती, पिकांचे नुकसान, बाधित क्षेत्र, पाणीटंचाई आणि चारा टंचाई याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय पथकाने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध भागांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान आलेले अनुभव, शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे आणि त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणे, हे शासनाचे प्राधान्य आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य दखल घेऊन त्यांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, केंद्र शासनाकडून आवश्यक मदत मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

या बैठकीला जलसंपदा मंत्री मा. श्री. गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मा. श्री. मकरंद आबा पाटील, कृषी विभाग व मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्र शासनाच्या आंतरमंत्रालयीन पथकाचे अधिकारी उपस्थित होते.

#dattatraybharne #FarmersFirst #droughtrelief #maharashtra #agriculture #शेतकरीहित #दुष्काळग्रस्तशेतकरी #शेतकरीमदत

8 hours ago | [YT] | 30

Dattatray Bharane Official

दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध! 🌾🤝

#DattatrayBharne #FarmersRelief #DroughtRelief #MaharashtraGovernment #शेतकरी #दुष्काळग्रस्तशेतकरी #शेतकरीमदत #दत्तामामाभरणे #महाराष्ट्रसरकार

2 days ago | [YT] | 1

Dattatray Bharane Official

📍 मौजै राजापूर, सांगोला, सोलापूर | ९ ऑक्टोबर २०२६

आज मौजे राजापूर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची पाहणी केली. पावसाअभावी संपूर्ण शिवारातील पिकं करपून गेल्याचं विदारक चित्र आहे. संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातच दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. केंद्रीय पथकही प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य मिळून भरीव मदत देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

#dattatraybharne #FarmersSupport #droughtrelief #agriculture #Solapur #sangola #शेतकरी #दुष्काळ #शेतकरी_मदत #सोलापूर #सांगोला

2 days ago | [YT] | 30

Dattatray Bharane Official

📍 सांगोला, सोलापूर | ९ ऑक्टोबर २०२६
केंद्रीय पथाकसोबत सोलापूर जिल्ह्यातील पिक परिस्थिती पाहणी दौरा

आज सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मौजे बुरलेवाडी येथे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांच्या सद्यस्थितीची पाहणी केली. सोलापूर जिल्ह्यातील ६० टक्क्यांहून पिक नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. पुढील दोन तीन दिवसांमध्ये शंभर टक्के पंचनाम्यांचे काम पुर्ण केले जाईल.

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, त्यांच्या नुकसानीची वस्तुस्थिती केंद्र सरकारपर्यंत पोहोचावी आणि आवश्यक मदत मिळावी, यासाठी शासन स्तरावर गांभीर्याने प्रयत्न सुरू आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर व अहिल्यानगर, विदर्भातील वाशिम व यवतमाळ, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय पथकातील अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. या पाहणीदरम्यान पीक परिस्थिती, नुकसानीची तीव्रता आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची वस्तुनिष्ठ माहिती संकलित केली जात आहे.

या पाहणीचा सविस्तर अहवाल तातडीने केंद्र शासनाकडे सादर करून राज्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी आवश्यक केंद्रीय मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. संकटाच्या या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

#dattatraybharane #CropDamage #FarmersRelief #Sangola #Solapur #maharashtra #पीकनुकसान #पीकपाहणी #शेतकरीहित #शेतकऱ्यांनादिलासा #सांगोला #सोलापूर #महाराष्ट्र

2 days ago | [YT] | 28

Dattatray Bharane Official

आज पुणे येथील माझ्या निवासस्थानी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

तरुण, उच्चशिक्षित आणि सक्षम नेतृत्व म्हणून डॉ. स्मिता जाधव यांच्याकडे पाहता येईल. शिक्षण क्षेत्रासोबतच व्यवस्थापनाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या व्हाइस चान्सलर म्हणून त्या जबाबदारी सांभाळत असून, विविध संस्थांच्या व्यवस्थापनाचा आणि प्रशासनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील सुशिक्षित, युवा आणि प्रगतिशील मतदारांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांच्यासाठी प्रभावीपणे काम करण्याची क्षमता डॉ. स्मिता जाधव यांच्यात आहे, असा मला विश्वास आहे.

आगामी निवडणुकीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
महायुतीच्या विजयासाठी आपण सर्वजण एकजुटीने काम करूया.

#punegraduateconstituency #graduateconstituency #SmitaJadhav #Mahayuti #pune #election2026 #पुणेपदवीधरमतदारसंघ #डॉस्मिताजाधव #महायुती #पुणे

3 days ago | [YT] | 100

Dattatray Bharane Official

🌱 राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया (Oilseeds Mission)

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि देशाला आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया ही महत्त्वाची योजना राबविण्यात येत आहे. 🌾

“तेलबिया उत्पादन वाढ, आत्मनिर्भरतेकडे देशाची वाटचाल”

🔷 योजनेचा उद्देश:
👉 तेलबियांचे उत्पादन वाढीद्वारे शेतकर्यांचे उत्पन्न सुधारून आत्मनिर्भरतेकडे जाणे

🌻 प्रमुख पिके:
✔️ सोयाबीन, भुईमूग, मोहरी, करडई, सूर्यफूल, तीळ

⚙️ योजनेचे प्रमुख घटक:
👉 मूल्य साखळी समूहांतर्गत (value chain cluster) पाच वर्षाआतील सुधारित प्रमाणित बियाणे वितरण (१००% अनुदानावर)
👉 सीड हब निर्मिती
👉 तंत्रज्ञान प्रसारासाठी पिक प्रात्याक्षिके
👉 काढणी पश्चात प्रक्रिया सुविधा अंतर्गत तेल काढणी युनिट (महत्तम १० टन क्षमता)
👉 गोदाम बांधकामास अर्थसहाय्य (२५० मेट्रिक टन क्षमता)

🎯 लाभार्थी प्राधान्य:
✔️ अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), महिला व दिव्यांग यासं विशेष प्राधान्य.

📲 अर्ज कसा कराल?
👉 MahaDBT पोर्टलवर अर्ज करा किंवा QR कोड स्कॅन करा.

📍 अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.

#dattatraybharane #oilseedsmission #AgriScheme #MahaDBT #farmersgrowth #AtmanirbharBharat #तेलबिया #कृषीयोजना #शेतकरीविकास #आत्मनिर्भरभारत #महाराष्ट्र #कृषीविभाग #महाराष्ट्रशासन

4 days ago | [YT] | 22

Dattatray Bharane Official

📍 मंत्रालय, मुंबई | ६ ऑक्टोबर २०२६

महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज पार पडली.

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, खरीप पिकांचे झालेले नुकसान, राज्यभर सुरू असलेले पंचनामे तसेच पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना करण्यात येणारी मदत याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही चर्चा झाली. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीतील सन्माननीय मंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#dattatraybharane #droughtrelief #FarmerSupport #MaharashtraFarmers #CropDamage #Panchnama #agriculture #maharashtra #दुष्काळीमदत #दुष्काळग्रस्तशेतकरी #शेतकरीहित #पंचनामा #पीकनुकसान #शेतकरी #कृषी #महाराष्ट्र

5 days ago | [YT] | 57

Dattatray Bharane Official

📍 मंत्रालय, मुंबई | ६ ऑक्टोबर २०२६

राज्यातील खत विक्रेत्यांच्या विविध अडचणी तसेच ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ व्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या अडचणींबाबत मंत्रालायातील बैठकीत सविस्तर चर्चा झाली. खत विक्रेत्यांसोबतच हा शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून या व्यवस्थेबाबत योग्य तो निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

#dattatraybharane #fertilizer #FertilizerSupply #farmers #FarmerSupport #MaharashtraAgriculture #agriculture #खत्ते #खतविक्रेते #खतविक्री #शेतकरी #शेतकरीहित #कृषी #महाराष्ट्र

5 days ago | [YT] | 32