Support & Fan Following:
A strong and growing community of supporters inspired by Pankaja Munde’s leadership, vision, and connection with the people.

Support • Follow • Subscrib


Pankaja Munde

भावपूर्ण श्रद्धांजली.

3 days ago | [YT] | 1,101

Pankaja Munde

Janta Darbar #pankajamunde

5 days ago | [YT] | 306

Pankaja Munde

ता. वडवणी (जि. बीड) येथील मोरवड व पुसरा, तसेच धारूर तालुक्यातील तेलगाव येथील शेतात प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी केली.

बळीराजाच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व प्रशासनाला तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

​#Beed #FarmersFirst #Maharashtra

5 days ago | [YT] | 175

Pankaja Munde

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून वार्ड क्रमांक 214 मधील महालक्ष्मी मंदिर परिसरात भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत आज स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला.

याठिकाणी उभारण्यात आलेल्या एनसीएमसी कार्ड नोंदणी स्टाॅलला देखील भेट दिली. नगरसेवक अजय पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी महालक्ष्मी देवीचे मनोभावे दर्शन घेतले.

#HappyBirthdayModiji
​#SevaSankalpAbhiyan #NarendraModi #Ambajogai #BJP

1 week ago | [YT] | 24

Pankaja Munde

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीच्या हेतूने नियोजनात्मक विकासाचे महत्त्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.

​या बैठकीत ‘महाराष्ट्र वैरण विकास धोरण’ जाहीर करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता अधिक सक्षम व निश्चित होणार आहे.

राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार. जिल्हानिहाय चारा उत्पादन, लागवडीयोग्य गवतांची यादी, वैरण उपयुक्त वृक्षांची यादी, सुधारित चारा पिके, पारंपरिक व अपारंपरिक चारा स्त्रोत यांचा विचार. विविध शासकीय वैरण विकास योजनांचे नियोजन.

​या निर्णयामुळे पशुपालन आणि दुग्धव्यवसाय या शेतीपूरक व्यवसायांना भक्कम बळ मिळणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळेल!

#पशुसंवर्धन

1 week ago | [YT] | 4

Pankaja Munde

ताईंची स्टाईलच वेगळी—भेट छोटी, आठवण मोठी!

1 week ago | [YT] | 5

Pankaja Munde

डीघोळअंबा (ता. अंबाजोगाई) येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली.

शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेत, पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून दिलासा देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

याप्रसंगी मा.खा.डॉ प्रितमताई मुंडे, अक्षय मुंदडा आणि इतर उपस्थित होते.
Devendra Fadnavis Dr Pritam Gopinath Munde
Akshay Mundada

​ #Ambajogai #Beed #FarmerSupport #DroughtRelief #शेतकरी बळीराजा

1 week ago | [YT] | 7