Tarun Bharat Sanwad Solapur



Tarun Bharat Sanwad Solapur

Ganeshotsav 2026 : मोहोळच्या गणेशोत्सव मंडळात तरुणाचा मृत्यू

मोहोळ शहरातील मोरया गणेशोत्सव मंडळात 24 वर्षीय अनुराग नामदेव पवार यांना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची घटना घडली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतनाथ माने करीत आहेत.

#Mohol #MoholNews #SolapurNews #MaharashtraNews #GaneshFestival #Ganeshotsav #GaneshMandap #GaneshUtsav

16 hours ago | [YT] | 0

Tarun Bharat Sanwad Solapur

Solapur News : सोलापुरात तृतीयपंथीयाचा आत्महत्येचा प्रकार, प्रियकरावर त्रासाचा आरोप

सोलापुरात 21 वर्षीय तृतीयपंथीयाचा आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. मृत व्यक्तीच्या गुरूंनी प्रियकराकडून मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याचा आरोप केला असून, संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

#Solapur #SolapurNews #SuicideCase #SuicideNews #Transgender #TransgenderCommunity #TransgenderNews #21YearOld

18 hours ago | [YT] | 0

Tarun Bharat Sanwad Solapur

Solapur News : बोरामणी येथे विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेलेल्या 47 वर्षीय शब्बीर हुसेन मुल्ला यांचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. 16 सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून, त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

#Boramani #Solapur #SolapurNews #AccidentalDeath #DrowningIncident #WellAccident #MaharashtraNews

3 days ago | [YT] | 0

Tarun Bharat Sanwad Solapur

Solapur News : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे शेताच्या बांधावरून झालेल्या वादातून अल्पवयीन मुलीसह तिची आजी आणि चुलत भावाला मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात BNS आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार अल्पवयीन मुलीला दोरी लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असून, चारही आरोपी अद्याप अटकेत नाहीत.

#Solapur #SouthSolapur #Antroli #MandrupPolice #MaharashtraNews #CrimeNews #POCSO #BNS

3 days ago | [YT] | 0

Tarun Bharat Sanwad Solapur

Solapur News : सांगोल्यातील सामाजिक संस्थेला CSR आणि TPF फंडातून 25 कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 44 लाख 96 हजार रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी सांगितलेल्या कंपन्यांची चौकशी केली असता त्या नावाच्या कंपन्या अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले.

#SolapurNews, #Sangola, #SangolaNews, #CSRScam, #FraudCase, #FinancialFraud,

2 weeks ago | [YT] | 1

Tarun Bharat Sanwad Solapur

Solapur Accident News : सोलापूर-पंढरपूर मार्गावर इंचगाव टोलनाक्याजवळ अचानक कुत्रा दुचाकीच्या आडवा आल्याने अपघात झाला. दुचाकी घसरल्यामुळे महादेव जगदाळे आणि ऋतुजा डांगे हे दोघे जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.

#SolapurNews #SolapurAccident #PandharpurRoad #RoadAccident #BikeAccident #SolapurPandharpurRoad #Injured

3 weeks ago | [YT] | 0

Tarun Bharat Sanwad Solapur

Damaji Sugar Factory : दामाजी कारखान्याच्या गेटवर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा एल्गार! 15 दिवसांपासून आंदोलन सुरू!

#DamajiSugarFactory #RetiredEmployees #RetiredWorkers #EmployeesProtest #WorkersProtest #FactoryProtest #SugarFactory

3 weeks ago | [YT] | 2

Tarun Bharat Sanwad Solapur

Solapur News : सोलापूर महापालिकेतील 130 रिक्त पदांपैकी 127 पदे तातडीने भरण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार असून, परीक्षेसाठी TCS किंवा IBPS पैकी संस्थेची निवड करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.

#SolapurNews, #Solapur, #SolapurMunicipalCorporation, #SMC, #MunicipalRecruitment,

3 weeks ago | [YT] | 5

Tarun Bharat Sanwad Solapur

Solapur News : बोरामणीमध्ये 40 एकरवर भव्य कृषी मार्केट! कांदा, डाळिंब, बेदाणा अन् सोयाबीनसाठी स्वतंत्र लिलाव

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सोलापूर-हैदराबाद महामार्गालगत बोरामणी येथे 40 एकर जागेवर आधुनिक कृषी मार्केट उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या नव्या मार्केटमध्ये कांदा, डाळिंब, बेदाणा आणि सोयाबीनसाठी स्वतंत्र लिलाव व्यवस्था उभारण्याची योजना आहे. सोलापुरातील कांदा आणि द्राक्ष मार्केटला मोठी बाजारपेठ मिळाल्याने सध्याची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे भविष्यातील वाढता व्यापार लक्षात घेऊन लिलाव प्रक्रिया नवीन जागेवर स्थलांतरित करण्याचे नियोजन केले जात आहे.

#SolapurNews, #Boramani, #AgricultureMarket, #AgriculturalMarket, #SolapurAPMC, #OnionMarket,

3 weeks ago | [YT] | 2

Tarun Bharat Sanwad Solapur

Solapur News : वेळापुरातील जैन मंदिरात चोरी! देवाच्या मूर्तीवरील 25 हजारांचे पंचधातूचे छत्र लंपास!

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील श्री 1008 अजितनाथ दिगंबर जैन मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी देवाच्या मूर्तीवरील सुमारे 25 हजार रुपये किमतीचे पंचधातूचे छत्र चोरून नेले. ही घटना 26 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

#SolapurNews, #Velapur, #Malshiras, #JainTemple, #JainTempleTheft, #TempleTheft, #CrimeNews,

3 weeks ago | [YT] | 2