Official YouTube Channel Of Ex Minister and Member Of legislative Assembly-Maharashtra


Suresh Dhas

मतदारसंघातील शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहून मुलगा सागर याने उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला, तसेच शोकाकुल कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबीयांना धीर दिला.

📍शिरूर येथे ‘जगदंबा फ्लेक्स प्रिंटिंग’च्या भव्य शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहून नवीन व्यवसायासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या नवीन व्यवसायाला अधिक भरभराट आणि उत्तरोत्तर यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

📍हातोला येथे श्री. चंद्रकांत आप्पा गर्जे यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबीयांना धीर दिला.

दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

#आष्टी #जनसंवाद #हार्दिक_शुभेच्छा #भावपूर्ण_श्रद्धांजली #सांत्वन_भेट

11 minutes ago | [YT] | 1

Suresh Dhas

स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, कडा (ता. आष्टी) - वार्षिक सर्वसाधारण सभा


📍कडा, (ता. आष्टी)

आष्टी तालुक्यातील स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, कडा यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहिलो. या सभेत दि. ३१ मार्च २०२६ अखेरील वार्षिक हिशोब पत्रकाचाही सविस्तर आढावा घेतला.

संस्थेच्या सर्व संचालक मंडळ व सभासदांच्या कार्यतत्परतेमुळे या संस्थेने ५१ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत सुवर्णमहोत्सवी वर्षात भव्य वटवृक्षाप्रमाणे प्रगती साधली आहे. संस्थेच्या एकूण ९९० सभासदांच्या माध्यमातून एकूण भागभांडवल ₹२९ कोटी ३० लाख ६३ हजार ३४६ इतके असून, सभासदांच्या एकूण ठेवी ₹६८ कोटी ८९ लाख ०२ हजार ५९१ इतक्या मोठ्या प्रमाणावर पोहोचल्या आहेत. संस्थेने सभासदांना एकूण ₹९४ कोटी ८३ लाख ५४ हजार ४३० इतके कर्जवाटप केले असून, यंदाच्या वर्षात ₹२ कोटी ११ लाख ०१ हजार ४९९.९८ इतका निव्वळ नफा नोंदवला आहे.

फक्त कर्जसुविधाच नव्हे, तर विमा संरक्षण, बचत प्रोत्साहन, संगणकीकृत पारदर्शक कामकाज, मोबाईल ॲप, चेकलेस बँकिंग, SMS बँकिंग तसेच क्यूआर कोड सुविधा अशा आधुनिक सेवा संस्थेने सभासदांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

संस्था शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांतही अग्रणी असून मिशन जरेवाडी गुणवत्ता विकास अभियान, स्वच्छ शाळा - सुंदर शाळा, गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान, आदर्श शिक्षक पुरस्कार अशा उपक्रमांद्वारे शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहे.

यानिमित्ताने मनोगत व्यक्त करताना, "गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सर्व शिक्षकांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, शिक्षक हा समाजाचा आरसा असल्याने त्यांचे योगदान भविष्यातील पिढी घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे," अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. मारुती पठाडे सर, उपाध्यक्ष श्री. अशोक लटपटे सर, मानद सचिव श्री. महेशकुमार शिंदे सर, गटशिक्षणाधिकारी श्री. महामुनी सर, कडा बाजार समिती सभापती श्री. संजय ढोबळे तांबोळी, पं.स. सभापती श्री. बद्रीनाथ जगताप, मंडल अध्यक्ष श्री. अनिल ढोबळे, सरपंच श्री. संदीप खाकाळ यांच्यासह सर्व सभासद, संचालक मंडळ यांच्यासह शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#स्वामीविवेकानंद_शिक्षकपतसंस्था #वार्षिक_सर्वसाधारणसभा #शिक्षकसहकार #शैक्षणिक_विकास #आष्टी

2 hours ago | [YT] | 6

Suresh Dhas

📍अद्वैतचंद्र निवासस्थान, आष्टी

आष्टी तालुक्यातील पांगरा येथील श्री. अण्णा पुंजा दराडे, श्री. पोपटराव दराडे, श्री. देविदास दराडे, श्री. दीपक दराडे आणि श्री. हरी दराडे यांनी आपल्या व्यवसायात आणखी एका मालवाहतूक वाहनाची भर घातली आहे.

आज अद्वैतचंद्र निवासस्थानी या नवीन गाडीचे पूजन माझ्या हस्ते संपन्न झाले. कष्ट, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर व्यवसायाचा विस्तार करणाऱ्या दराडे परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

तरुणांनी नवनवीन व्यवसायाची वाट निवडून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. त्यांच्या व्यवसायाची दिवसेंदिवस भरभराट होवो, प्रगतीची नवी शिखरे गाठोत, हीच सदिच्छा!

यावेळी माजी उपसभापती श्री. गौतम नाना आजबे, माजी सरपंच श्री. वसंत मिसाळ, श्री. बाबासाहेब चोपदार, श्री. रामदास दराडे, श्री. रामनाथ माणिक मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

#हार्दिक_शुभेच्छा #व्यवसायवाढ #उद्योजकता #तरुणउद्योजक #आष्टी

3 hours ago | [YT] | 4

Suresh Dhas

📍आष्टी

मा. नगरसेवक शेरूभाई शेख यांच्या भाची व श्री. फैयाज सय्यद यांचे बंधू श्री. सय्यद सोहेल यांच्या साखरपुडा सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित मान्यवर व कुटुंबियांशी स्नेहपूर्ण संवाद साधला.

#साखरपुडा #शुभेच्छा #आष्टी

3 hours ago | [YT] | 2

Suresh Dhas

📍मॉर्निंग क्रीडा संकुल, नगर-बीड रोड, आष्टी

अबरार शेख मित्र मंडळ, आष्टी यांच्या वतीने आयोजित ‘आण्णा चषक’ भव्य टेनिस बॉल एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला उपस्थित राहिलो.

स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला ₹३१,१११, तर द्वितीय क्रमांकाच्या संघाला ₹२१,००० रुपयांचे बक्षीस आहे. स्पर्धेतील सामने ७ षटकांचे असून, प्रत्येक सामन्यातील सामनावीराला ट्रॉफी आणि मेडल देण्यात येणार आहे.

यावेळी सहभागी संघातील सर्व खेळाडूंशी संवाद साधला आणि स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

#आण्णाचषक #आष्टी #टेनिसबॉलक्रिकेट #क्रिकेटस्पर्धा #CricketTournament2026

5 hours ago | [YT] | 5

Suresh Dhas

दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे संरक्षण व व्यवस्थापन कार्यशाळा; शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या!

📍 मोरेश्वर मंगल कार्यालय, आष्टी

आष्टी विधानसभा मतदारसंघातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित ‘दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे संरक्षण व व्यवस्थापन’ या मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी होत शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

या वेळी डॉ. गणेश मंडलिक साहेब, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव (ता. गेवराई) यांनी पाणीटंचाईच्या काळात फळबागांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर तसेच आवश्यक खते व औषधांच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढील महत्त्वाच्या मागण्या व सूचना संबंधित विभागांसमोर मांडल्या—

🔹 एक हेक्टर तसेच एक एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या फळबागांची ७/१२ वर स्वतंत्र नोंद नसल्यामुळे संबंधित शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

🔹 दुष्काळी परिस्थितीत फळबागांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे सुलभ व्हावे यासाठी ठिबक सिंचन संच तातडीने उपलब्ध करून देणे आणि पात्र शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वेळेत मिळावे, याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली.

🔹 फळबागा जगविण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याकरिता प्रति हेक्टर किमान ₹२ लाखांचे विशेष अर्थसहाय्य राज्य शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे शेतकरी शिष्टमंडळासह मांडण्याचा शब्द उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

🔹 रोजगार हमी योजनेच्या फलोत्पादन विभागाच्या माध्यमातून फळबागांची देखभाल, पाणीपुरवठा व संवर्धनासाठी VB-GRAM G अंतर्गत आवश्यक मनुष्यबळ व अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव संबंधित मंत्र्यांसमोर मांडण्याचे आश्वासन दिले.

🔹 सन २०१२ मधील दुष्काळाच्या काळात फळबागा जगविण्यासाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या धोरणाच्या धर्तीवर, केंद्र शासनाकडूनही फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शेतकरी शिष्टमंडळासह पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

फळबाग वाचली तर शेतकऱ्याचे पुढील अनेक वर्षांचे उत्पन्न वाचेल. त्यामुळे सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना केवळ तात्पुरती नव्हे, तर तातडीची, ठोस आणि प्रभावी मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.

आष्टी मतदारसंघामध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, कडुलिंब, तैवान पेरू, ड्रॅगन फ्रूट, आंबा, चिकू, केळी, सीताफळ, पपई, जांभूळ, बोर, चिंच, नारळ, खजूर यांसह विविध फळबागांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. तसेच पाटोदा तालुक्यातील काही भागांमध्ये टरबूज, खरबूज, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि झेंडू यांसारख्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. तरटे साहेब, श्री. गांगर्डे साहेब, श्री. आंधळे साहेब, सभापती श्री. संजय ढोबळे, श्री. बद्रीनाथ जगताप, श्री. केशव रसाळ, श्री. परमेश्वर काका, श्री. विष्णुपंत नाना चव्हाण, श्री. रमेश गावडे, श्री. रामदास हांगे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, मान्यवर आणि आष्टी तालुक्यातील फळबाग उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांची फळबाग वाचविण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी पाठपुरावा सुरूच राहील!

#शेतकरी #दुष्काळ #शेतकरीहित #कृषी #MaharashtraFarmers

5 hours ago (edited) | [YT] | 5

Suresh Dhas

'निपुण बीड अभियान'अंतर्गत शालेय स्पर्धा परीक्षा - शिक्षक कार्यशाळा; शिक्षणाच्या गुणवत्तावाढीवर विशेष भर!

📍आष्टी

बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित 'निपुण बीड अभियान' अंतर्गत शालेय स्पर्धा परीक्षा व शिक्षक कार्यशाळेच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेच्या शाळा या केवळ इमारती नसून, ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचा मुख्य आधार असल्याचे नमूद करत, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. यावेळी वर्ग पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी, अध्यापनात AI व तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षकांना गैर-शैक्षणिक कामांच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा तसेच 'आमदार श्री शाळा' उपक्रमांतर्गत डिजिटल विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील 'वसुंधरा विद्यालया'च्या विद्यार्थ्यांनी पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर मिळवलेल्या यशाचे कौतुक करत, असेच यश गावोगावच्या जिल्हा परिषद शाळांमध्येही निर्माण व्हावे, हेच ध्येय आहे. या प्रसंगी गटविकास अधिकारी श्री. प्रयाग ढमाळ, श्री. संतोष माने, श्री. भरत नागरे, गटशिक्षणाधिकारी श्री. रवींद्र महामुनी, श्री. सिद्धांत कांबळे, श्री. प्रशांत शिंदे तसेच राज्यभरातून आलेले तज्ज्ञ मार्गदर्शक व मोठ्या संख्येने शिक्षकवृंद उपस्थित होते.

#निपुणबीडअभियान #शिक्षणक्रांती #गुणवत्तापूर्णशिक्षण #डिजिटलशिक्षण #शिक्षकसक्षमीकरण

9 hours ago | [YT] | 6

Suresh Dhas

📍पीएमश्री जिल्हा परिषद कन्या प्रशाला, आष्टी

आज पीएमश्री जिल्हा परिषद कन्या प्रशाला, आष्टी येथे 'रोज एक तास श्रमदान' या उपक्रमांतर्गत परिसर स्वच्छता करण्यात आली.

स्वच्छ, सुंदर व हिरव्यागार आष्टीच्या संकल्पपूर्तीसाठी हा उपक्रम नियमितपणे सुरू असून, नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे अभियान अधिक बळकट होत आहे.

#आष्टी #श्रमदान #स्वच्छता

9 hours ago | [YT] | 3

Suresh Dhas

आज आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त माझ्या लेकीला एवढीच मनापासून शुभेच्छा -
तुझ्या महत्त्वाकांक्षी पंखांना सदैव बळ मिळू दे…
तुझ्या स्वप्नांना आकाशाची उंची मिळू दे…
आणि आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर तुला यश, आनंद आणि समाधान मिळू दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना...
वडील म्हणून तुझ्यावर प्रेम करण्यासाठी कोणताही दिवस पुरेसा नाही…
कारण तू आहेस, म्हणून माझं जग पूर्ण आहे!

#आंतरराष्ट्रीय_कन्या_दिन #internationaldaughtersday

10 hours ago | [YT] | 11

Suresh Dhas

पर्यटन म्हणजे केवळ प्रवास नाही,
तर संस्कृती, निसर्ग आणि माणसांशी जोडणारा अनुभव!
जागतिक पर्यटन दिन

पर्यटनाला चालना देतानाच स्थानिक संस्कृती, पर्यावरण आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या समृद्ध वारशाची आणि निसर्गसौंदर्याची ओळख जगभर पोहोचवूया.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

#जागतिकपर्यटनदिन #WorldTourismDay #ExploreIndia #IncredibleIndia #SustainableTourism

10 hours ago | [YT] | 2