कृष्णगजल- जयेश पवार

नमस्कार
रसिक मायबाप😊💐

माझ्याबद्दल सांगण्यासारखं असं काहीच नाही...
जितकं तुम्हाला माझ्या लिखाणातून मला वेचता येईल तितकाच मी..
पारिजातकाच्या सड्याप्रमाणे..

विसरत गेलोय धून जी पाठांतर होती ,
वाऱ्यावर फिरवून बासरी काय लिहावे ?

एवढे लिहून झाल्यावरी काय लिहावे ?
पाऊस, वादळ, वारा, सरी.. काय लिहावे ?..
~~~~~~~

बासरी आहे तुझ्यासोबत तुझी केवळ ,
पण दिसत नाही इथे राधा ...कुठे गेली ?..

जी मला भेटायच्या आधी तुला होती ,
ती तुझी उत्सूकता आता कुठे गेली !..
★★★★

फारसे नव्हते कुणी माझ्याबरोबर
कृष्ण होता भोवताली फक्त माझ्या..

© जयेश पवार

Poet& performer/video editing - जयेश पवार

ALL social media advertising - "Team कृष्णगजल via गजलेबद्दल "

आपले सर्वच सोशल मीडिया हँडल लिंक - आपल्या चॅनलवर आहेत..

चॅनल नक्की subscribe करून बेल आयकॉनवर क्लिक करा👍👍😊म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला मिळतील😊💐



कृष्णगजल- जयेश पवार

*तिला देवी म्हणण्याआधी... यावर विचार कर..*🧡

पर्वताचं सौंदर्य केवळ त्याच्या उंचीत नसतं, तर कितीही वादळं आली तरी स्वतःच्या जागी ठाम उभं राहण्यात असतं. शैलपुत्रीच्या रूपात आपण याच स्थैर्याचं पूजन करतो. पण मित्रा, एखादी स्त्री स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहिली, स्वतःच्या हक्कांसाठी उभी राहिली, की तिच्या स्थिर बुद्धीवरच प्रश्न का उपस्थित होतात? तुझ्या मताशी सहमत असेपर्यंत ती समंजस आणि विरोधात गेली की स्वार्थी? तुझ्या अपेक्षांनुसार जगली तर संस्कारी आणि स्वतःच्या इच्छेने जगू लागली की बिघडलेली? तू मत बदललंस तर "परिस्थितीशी जुळवून घेणारा", पण तिने भूमिका बदलली तर ती "अस्थिर"? स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहणं हा तुझा आत्मविश्वास आणि तिचा मात्र अहंकार कसा काय ठरतो? समाज म्हणून आपण अजून असे किती काळ दुटप्पी वागत राहणार?..देवीच्या सामर्थ्यापुढे नतमस्तक होताना स्त्रीच्या सामर्थ्यालाही मनापासून स्वीकार. तिला तुझ्या विचारांच्या चौकटीत बसवण्याऐवजी तिच्या विचारांसाठी मनाची कवाडं आतातरी उघड..

एकतर तिच्या सामर्थ्याला उंची देणारा पर्वत हो, नाहीतर तिच्या मार्गात अडथळा होणारा कडा तरी होऊ नकोस, सख्या..

© सुप्रिया ज्योती सोमप्रकाश @s.u.p_r_i.y.a

#navratrispecial❤️ #firstday #navratrivibes❤️ #नवरात्रोत्सव #jayeshpawargazal

2 hours ago | [YT] | 22

कृष्णगजल- जयेश पवार

कविता फक्त लिहायची नसते, ती जगायची असते... ✍️


मराठी कविता, गझल आणि लेखनाची आवड असेल तर ही कार्यशाळा तुमच्यासाठी आहे.
या WORKSHOP मध्ये तुम्ही शिकाल: ✨

गझल लेखनाची मूलतत्त्वे
✨ वृत्त, यमक, अंतयमक
✨ कवितेचे विविध प्रकार
✨ प्रभावी लेखनाची शैली
तुमच्या लेखणीला योग्य दिशा देण्यासाठी आजच सहभागी व्हा.
📲 अधिक माहितीसाठी WhatsApp वर संपर्क करा: 8010014473

मराठीसाठी एक पाऊल पुढे टाकूया... चला, एकत्र शिकूया! ❤️


#मराठीकविता #गझल #लेखन #MarathiWorkshop #जयेशपवार

1 day ago | [YT] | 5

कृष्णगजल- जयेश पवार

कविता फक्त लिहायची नसते, ती जगायची असते... ✍️


मराठी कविता, गझल आणि लेखनाची आवड असेल तर ही कार्यशाळा तुमच्यासाठी आहे.
या WORKSHOP मध्ये तुम्ही शिकाल: ✨

गझल लेखनाची मूलतत्त्वे
✨ वृत्त, यमक, अंतयमक
✨ कवितेचे विविध प्रकार
✨ प्रभावी लेखनाची शैली
तुमच्या लेखणीला योग्य दिशा देण्यासाठी आजच सहभागी व्हा.
📲 अधिक माहितीसाठी WhatsApp वर संपर्क करा: 8010014473

मराठीसाठी एक पाऊल पुढे टाकूया... चला, एकत्र शिकूया! ❤️

#marathigazal #MarathiWorkshop #jayeshpawargazal

1 day ago | [YT] | 7

कृष्णगजल- जयेश पवार

कधीकधी, तुमचं स्वप्न आणि तुमचं आयुष्य यात केवळ 'वेळ' हेच अंतर असते. 🦋

अळीचे फुलपाखरू एका रात्रीत होत नाही.
काही स्थित्यंतरे शांतपणे आणि जगाच्या नजरेपासून दूर घडत असतात.

त्यामुळे, जर सध्या तुमचे आयुष्य एका जागी थांबल्यासारखे वाटत असेल, तर आशा सोडू नका.

तुम्ही मागे पडलेले नाही आहात,
तर तुम्ही घडत आहात.

प्रगती करत रहा,
विश्वास ठेवा आणि पुढे जात रहा.
एक दिवस मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की, प्रत्येक विलंब तुम्हाला त्या क्षणासाठी तयार करत होता,
जेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने झळाळून उठायचे होते. 🤍

फक्त त्या योग्य क्षणाची वाट पहा. तुमचं स्वप्न पूर्ण करणारी वेळ नक्कीच येईल. ✨

-जयेश पवार ‪@jayeshpawargazal‬

#jayeshpawargazal #marathimotivational #selflove #marathipost #marathistories

2 days ago | [YT] | 85

कृष्णगजल- जयेश पवार

नाना गेले… पण आपल्या मनातून नाही.. 💔

अभिनय म्हणजे केवळ संवाद बोलणे नाही,
तर एखादं पात्र जगणं असतं… हे ज्यांनी आपल्या अभिनयातून दाखवून दिलं, त्या महान कलावंताला आज आपण मुकलो.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि समाजासाठी अहोरात्र योगदान देणारे नाना पाटेकर आज आपल्यातून निघून गेले.

नटसम्राट, क्रांतिवीर, परिंदा, प्रहार, अब तक छप्पन, वेलकम अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या आवाजातला तो करारीपणा, डोळ्यांतला तो भाव आणि अभिनयातली ती प्रामाणिकता… पुन्हा कदाचित कधीच पाहायला मिळणार नाही.

पडद्यावरचा हा नाना जितका मोठा कलाकार होता, तितकंच माणूस म्हणूनही त्यांचं व्यक्तिमत्त्व मोठं होतं. समाजासाठी त्यांनी केलेलं कामही त्यांच्या कलेइतकंच प्रेरणादायी राहील.

आज एक अभिनेता गेला नाही…
एक संपूर्ण अभिनयशाळा हरपली आहे.

नाना, तुमच्या भूमिका कायम जिवंत राहतील,
तुमचे संवाद कायम कानात घुमत राहतील,
आणि तुमचा अभिनय पुढच्या कित्येक पिढ्यांना शिकवत राहील…

भावपूर्ण श्रद्धांजली नाना! 🙏💐
तुम्ही पडद्याआड गेलात,
पण आमच्या आठवणींतून कधीच जाणार नाहीत.

-जयेश पवार ‪@jayeshpawargazal‬

#नाना_पाटेकर #श्रद्धांजली #NanaPatekar #मराठीसिनेमा #मराठीकलावंत

3 days ago | [YT] | 157

कृष्णगजल- जयेश पवार

तू योग्य जोडीदार आहेस..🥰 ❤️

काही भावना शब्दांत मांडणे कठीण असते, पण ही पोस्ट त्या भावनांच्या अगदी जवळ जाणारी आहे..🥹❤️

जी व्यक्ती तुमच्यासाठी सर्वस्व आहे, तिला टॅग करा..💌

‪@jayeshpawargazal‬ ला Subscriber करा — दररोज नवीन 'लव्ह आर्ट'..🌸

#love #explore #instagood #fyp #trending

3 days ago | [YT] | 86

कृष्णगजल- जयेश पवार

काही मित्र आपल्याला आयुष्यात भेटतात…
पण आयुष्याच्या धावपळीत
कमावलेले मित्र आता फार दूर गेलेत, त्यांना हवं ते कमावण्यासाठी… 🥺❤️

कधी वेळ मिळाला तर परत या…
गप्पा अजूनही तिथेच थांबल्या आहेत. ❤️
I miss you मित्रांनो🥺💖🫀 Tag your friends group ज्यांची आपल्याला आठवण येतेय..

Subscribe ‪@jayeshpawargazal‬ for more

- जयेश पवार ‪@jayeshpawargazal‬

#jayeshpawargazal #marathipost #friendship #marathistories #marathimotivational

3 days ago | [YT] | 54

कृष्णगजल- जयेश पवार

काहीजण केवळ वयाने मोठे होतात. तर काहीजण अधिक समजूतदार बनतात,
कारण आयुष्य त्यांना अशा जबाबदाऱ्या देते
ज्यांची त्यांनी कधीच मागणी केलेली नसते.

तुम्ही गोष्टी शांतपणे सावरून नेण्यास शिकता.
स्वतःलाच समजून घेण्याच्या प्रक्रियेत असतानाही निर्णय घेता.
तुम्ही किती थकला आहात याची कोणालाच जाणीव नसतानाही पुढे चालत राहता.
मोठे होण्यातील ही एक विलक्षण गोष्ट आहे—

वय केवळ तुमची वर्षे बदलते, पण जबाबदारी मात्र तुमचा आत्मा बदलून टाकते.

पटलं असेल तर कमेंटमध्ये ❤️ द्या..😊👍

-जयेश पवार ‪@jayeshpawargazal‬

#jayeshpawargazal #marathilovestory #marathistories #marathimotivational #marathipost

3 days ago | [YT] | 48

कृष्णगजल- जयेश पवार

काही नाती रक्ताची नसतात…
काही नाती नावाचीही नसतात…
पण तरीही ती आयुष्यभर मनाच्या सगळ्यात जवळची असतात. ❤️

एक छोटीशी मुलगी आपल्या कुत्र्याला विचारतेय—
“तू सुद्धा मला सोडून जाशील का?”

आणि त्याचं उत्तर जणू त्याच्या डोळ्यांतूनच ऐकू येतं…

“नाही…
मी माणूस नाही ना…
माणसांसारखं तुला अर्ध्यावर सोडून जाणार नाही.” 🥺🐾

माणसं कधी कधी परिस्थिती बदलली की बदलतात,
नाती बदलली की माणसं बदलतात,
गरज संपली की काहीजण आपलेपणही संपवतात…

पण या मुक्या जीवांना ना स्वार्थ कळतो,
ना अपेक्षांचं गणित…
त्यांना फक्त आपलं माणूस कळतं. ❤️

तुम्ही त्यांना एकदा प्रेम दिलंत,
की ते त्या प्रेमाला आयुष्यभर जपतात.
तुम्ही त्यांना घर दिलंत,
की ते तुम्हाला आपलं संपूर्ण जग समजतात.

म्हणूनच कदाचित कुत्र्याचं प्रेम इतकं वेगळं असतं…
आपण त्यांच्यासाठी आयुष्याचा एक भाग असतो,
पण ते आपल्याला त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा भाग बनवतात. 🐶❤️

कधी कधी वाटतं,
माणसांनी या मुक्या जीवांकडून प्रेम शिकायला हवं…
कारण नातं निभावण्यासाठी शब्दांची नाही, मनाची गरज असते.

ज्यांनी कधीही तुमची साथ सोडली नाही,
अशा प्रत्येक मुक्या जीवाला मनापासून सलाम. ❤️🐾

पोस्ट आवडल्यास कमेंटमध्ये ❤️ द्या...👇

— जयेश पवार ‪@jayeshpawargazal‬

#jayeshpawargazal #marathistories #marathimotivational #marathipost #marathilove

5 days ago | [YT] | 131

कृष्णगजल- जयेश पवार

१०,०००… हा फक्त एक आकडा नाही; माझ्या लेखनाच्या प्रवासात मिळालेल्या हजारो प्रेमळ मनांची ही पावती आहे

२६ मे २०२१ रोजी सुरू झालेला ‘कृष्णगजल’चा हा प्रवास आज ४ ऑक्टोबर २०२६ रोजी १०,००० Subscribers पर्यंत पोहोचला

या प्रवासाकडे मागे वळून पाहताना मनात एकच भावना आहे—कृतज्ञता!

माझ्या लेखनावर, शब्दांवर आणि सादरीकरणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक रसिकाचे मनःपूर्वक आभार.

माझ्या कविता, गजल आणि कथा केवळ वाचणारेच नाही, तर त्या तोंडपाठ करून माझ्यासोबत म्हणणारे रसिक,
माझ्या कार्यक्रमांसाठी दूरदूरहून आवर्जून येणारे मित्र,
माझ्या प्रत्येक सादरीकरणावर भरभरून प्रेम करणारे श्रोते,
तुमच्यामुळेच माझ्या शब्दांना खऱ्या अर्थाने जीव मिळाला. ❤️

माझ्या ‘तुझ्यानंतर’ गजलसंग्रहावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक वाचकाचेही मनापासून आभार.

पुस्तक हातात घेऊन त्यातील शब्द आपल्या मनाशी जोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रेम माझ्यासाठी खूप मोठी कमाई आहे.

या प्रवासात माझ्या प्रत्येक चढ-उतारात माझ्या सोबत खंबीरपणे उभी राहिलेली माझी अर्धांगिनी, माझी जीवनसाथी @s.u.p_r_i.y.a
तिने माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला आणि मला प्रत्येक टप्प्यावर मनापासून साथ दिली.
माझ्या लेखनासाठी, कार्यक्रमांसाठी आणि या संपूर्ण प्रवासासाठी तिने दिलेला आधार मी कधीच विसरू शकणार नाही. ❤️

माझे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि माझ्या लेखनाच्या प्रवासात सुरुवातीपासून माझ्यावर विश्वास ठेवणारे प्रत्येकजण—
तुम्ही माझ्यासोबत नसता, तर कदाचित हा प्रवास इतका सुंदर झाला नसता.
Facebook, Instagram, WhatsApp आणि YouTube वरची आपली ‘कृष्णगजल फॅमिली’
तुम्ही प्रत्येक पोस्टवर दिलेलं प्रेम, प्रत्येक कमेंट, प्रत्येक शेअर, प्रत्येक मेसेज आणि प्रत्येक शुभेच्छा माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. ❤️
खरं सांगायचं तर
तुम्ही नसता, तर मी हे काहीच करू शकलो नसतो
माझे शब्द माझे असतील,
पण त्यांना अर्थ तुम्ही दिलात
माझ्या कवितांना आवाज तुम्ही दिलात
आणि माझ्या स्वप्नांना बळ तुम्ही दिलंत!
आज १०,००० हा टप्पा गाठताना मनापासून एकच विनंती—
अशीच साथ द्या,
आज १०,०००
उद्या त्यापुढचा आकडा
आणि त्यापुढेही कितीही शून्ये वाढत गेली, तरी त्या प्रत्येक शून्यामागे तुमचं प्रेम असावं, एवढीच मनापासून इच्छा! ❤️

आपली ‘कृष्णगजल’ फॅमिली अशीच वाढत राहू दे.
✍️ जयेश पवार ‪@jayeshpawargazal‬ 💙🦚

#कृष्णगजल #jayeshpawargazal #10000Subscribers #मराठीकविता #मराठीगजल

6 days ago | [YT] | 14