Moments, Happenings, Heart Touching Subjects, Wildlife, Poetry etc things are included in my presentations.


@TheShashin

नाना एक व्यक्तिमत्व

झगमगत्या प्रकाशात उभा राहूनही
ज्याने भर उन्हातील माणूस शोधला
जगतानाही त्याने साध्या माणसातील
जखमांचा भळ भळता घाव शोधला

भूमिका पडद्यावरच्या संपून जातील
टाळ्यांचे आवाजही विरून जातील
पण भुकेल्या डोळ्यांतील पेटते दिवे
काळाच्या पल्याड तेवतच राहतील

नाना हे नाव एका व्यक्तीचं नाही हो
ते सलत्या दुःखाशी केलेलं नातं होतं
"नाम" हा शब्द नव्हे तर एक वचन
ज्यात त्याचं अवघं विश्व थांबलं होतं

काळ सारे चेहरे विसरेल कदाचित
इतिहासही काही क्षण गाळू शकेल
तरीही ज्याने मानव्याचे अश्रू पुसले
त्याला वर्तमान सांगा कसा विसरेल

कुणीच नसते येथे श्वाश्वत दोस्तांनो
शक्य आहे पावले मिटली जातील
मायेचा निर्झर मात्र वाहेल अविरत
कारण नाना हे नामच पुरून उरेल

स्वयेश्री (शशिन वरधावे) 9372087107

4 weeks ago | [YT] | 1

@TheShashin

Trust & Repect

4 months ago | [YT] | 2

@TheShashin

सुमन कल्याणपूर — एक स्वर, एक संस्कार, एक युग.
आज स्वरांच्या आकाशातील एक तेजस्वी तारा निःशब्द झाला.
संगीताच्या सुवर्णकाळाला आपल्या मधुर, निर्मळ आणि भावस्पर्शी स्वरांनी अजरामर करणारा हा आवाज आज अनंतात विलीन झाला आहे.
मराठी मातीने अनेक रत्नांना जन्म दिला; पण सुमनताईंसारखी स्वररत्ने क्वचितच जन्माला येतात. त्यांच्या गाण्यांत केवळ सूर नव्हते, तर भावना होत्या, संस्कार होते, आणि मनाला स्पर्शून जाणारी एक अद्भुत पावित्र्याची अनुभूती होती.
त्यांनी अनुभवलेले संघर्ष, जपलेली नम्रता आणि मिळवलेले यश हे प्रत्येक कलाकारासाठी प्रेरणास्थान राहील. त्यांच्या स्वरांनी प्रेमाला शब्द दिले, विरहाला आसवे दिली, भक्तीला दिशा दिली आणि आयुष्याला एक मधुर साथ दिली.
आज तो स्वरविष्कार पंचमहाभूतांत विलीन झाला असला, तरी त्यांचे सूर काळाच्या पलीकडे जाऊन सदैव घुमत राहतील. कारण काही आवाज देह सोडतात, पण अस्तित्व कधीच सोडत नाहीत.
स्वरांच्या त्या दिव्य प्रवासाला विनम्र अभिवादन.
भावपूर्ण श्रद्धांजली. 💐
"सूर थांबले असतील, पण त्यांची प्रतिध्वनी अजूनही काळाच्या हृदयात घुमत राहील..."

5 months ago | [YT] | 2

@TheShashin

ह्याला जबाबदार कोण ? प्रशासन की नागरिक ?
हे असे भविष्य घडविले तर राष्ट्र समृद्ध कसे होईल ?

5 months ago | [YT] | 2

@TheShashin

"The breathtaking view I saw today"

6 months ago | [YT] | 5