Amit Thackeray MNS Updates

Welcome to the ultimate destination for everything related to Raj Thackeray, Amit Thackeray, and the Maharashtra Navnirman Sena (MNS)!

Here, you’ll find daily updates, exclusive speeches, political rallies, powerful interviews, and in-depth insights on Maharashtra’s most dynamic political movement.

We bring you real-time news, unfiltered coverage straight from the heart of MNS activities — highlighting Raj Saheb’s inspiring leadership and Amit Thackeray’s vision for Maharashtra’s youth.

Whether you’re a supporter, follower, or simply interested in Maharashtra politics, this is your one-stop channel for authentic, timely, and engaging content.

🎯 Subscribe now and be part of the movement!
🔔 Stay updated with every major event, rally, and announcement from MNS!

🧡 #RajThackeray #AmitThackeray #MNS #MarathiManoos #ThackeraySpeech #ThackerayFamily #speech

राज ठाकरे, अमित ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्राचा आवाज

जय महाराष्ट्र! 🇮🇳 #JaiMaharashtra


Amit Thackeray MNS Updates

‪@HemantDesaiOfficial‬ यांचे विश्लेषण नक्की पहा.

2 months ago | [YT] | 3

Amit Thackeray MNS Updates

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी... चला, एकत्र येऊया!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात आपली 'सदस्य नोंदणी' अधिकृतपणे सुरू झाली आहे. याची सुरुवात मी स्वतः माझं सदस्य ओळखपत्र नोंदवून करत आहे!

शिक्षणव्यवस्थेत चाललेला गोंधळ, पेपरफुटीचे रॅकेट्स आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शोषणाविरुद्ध आपल्याला एकत्र येऊन पूर्ण ताकदीने लढा द्यायचा आहे.
मी महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला, विद्यार्थ्याला सांगू इच्छितो, दिलेला QR कोड स्कॅन करा किंवा www.joinmnvs.in या वेबसाईटला भेट देऊन आजच मनविसेचे सदस्य व्हा! #AmitThackeray #mnvs #membership #drive

3 months ago | [YT] | 106

Amit Thackeray MNS Updates

मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेतून मराठीला हद्दपार करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध!

२००८ साली राज साहेबांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी रेल्वे भरतीमध्ये मराठी भाषेचा आणि भूमिपुत्रांचा हक्क मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला होता. त्यानंतर २०१७, २०१९ आणि अगदी २०२३ पर्यंत या परीक्षा मराठीत होत होत्या. मग आता अचानक रेल्वे प्रशासनाला मराठी माणसाच्या संयमाची परीक्षा का पाहायची आहे?

मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनाने १६ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या 'GDCE 01/2026' या अधिसूचनेत Computer Based Test (CBT) परीक्षेचे माध्यम केवळ 'हिंदी आणि इंग्रजी' ठेवले आहे. मराठी भाषेला या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक हद्दपार करण्याचा हा घाट घातला जात आहे.

रेल्वे प्रशासनाला आमचे काही थेट सवाल:
📍 ऑगस्ट २०२५ मध्ये रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत आश्वासन दिले होते की परीक्षा १५ प्रादेशिक भाषांत होतील. मग केंद्राचा हा आदेश स्थानिक अधिकारी कचऱ्याच्या टोपलीत टाकत आहेत का?
📍 विभागीय पदोन्नतीसाठी (Departmental Exam) मराठीची 'एलर्जी' का? मराठी माणसाची प्रगती होऊ नये, अशी नेमकी कोणाची इच्छा आहे?
📍 महाराष्ट्राच्या जमिनीवर नोकरी करायची आणि नोकरी देताना मात्र मराठीचा विचार करायचा नाही, ही कसली दडपशाही?

आमचा स्पष्ट इशारा आहे,
त्वरीत या अधिसूचनेत बदल करून 'मराठी' भाषेचा सन्मानाने समावेश करा. अन्यथा, या अपमानाचा जाब विचारायला आणि मराठी कामगारांच्या हक्कासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' मैदानात उतरेल.

लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या मातीत मराठीचा अपमान आम्ही अजिबात खपवून घेणार नाही! 🚩

-अमित राज ठाकरे
नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

7 months ago | [YT] | 354

Amit Thackeray MNS Updates

१९ मार्च २०२६ ला राजसाहेबांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर गुढी पाडवा मेळाव्यात महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांसाठीचा विकास आराखडा बनणवण्याच्या हेतूने, ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हे संकेतस्थळ महाराष्ट्राला अर्पण केलं. त्यानंतर गेल्या १२ तासांत या संकेतस्थळावर काही दशहजार लोकांनी भेट दिली. त्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांनी याच नावाचं एक दुसरं संकेतस्थळ बनवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा विघ्नसंतोषींच्या विरोधात जी कारवाई करायची असेल ती केली जाईल. पण आपल्या महाराष्ट्र नेक्स्ट या संकेतस्थळाची लिंक सोबत जोडत आहोत. ती जास्तीत जास्त महाराष्ट्रभर आणि देशभर पसरेल हे जरूर पहा.

Maharashtra-next.in

#MaharashtraNext #महाराष्ट्र_पुढचा

8 months ago | [YT] | 337

Amit Thackeray MNS Updates

महाराष्ट्र पुढचा': प्रगत महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंचे पुढचे पाऊल!

​सन्माननीय राजसाहेबांनी 'महाराष्ट्र पुढचा' (Maharashtra Next) हा प्रगत महाराष्ट्राचा विचार तमाम जनतेसमोर मांडला आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी तुमच्या मनात असलेल्या कल्पना, नाविन्यपूर्ण विचार किंवा सूचना आता तुम्ही थेट www.maharashtra-next.in/ ह्या संकेतस्थळावर मांडू शकता.

​प्रक्रिया समजून घ्या.

✅ ​तुमचे मत मांडणे गरजेचे, तुम्ही तुमच्या सूचना संकेतस्थळावर नोंदवू शकता.
✅ तुमच्या सूचना थेट त्या क्षेत्रातील अभ्यासकांपर्यंत पोहोचतील.
✅​ तुमच्या योग्य सूचनांचा पाठपुरावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केला जाईल.
✅​ जर सरकारला तुमची संकल्पना आवडली आणि त्याची अंमलबजावणी करायची असेल, तर तुमची परवानगी घेऊनच तुमची माहिती दिली जाईल, अन्यथा तुमची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.

​आजच सहभागी व्हा आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपला वाटा उचला!

#MNS #mnsadhikrut #RajThackeray #मनसे #महाराष्ट्रसैनिक #शिवतीर्थ

8 months ago | [YT] | 133

Amit Thackeray MNS Updates

गुढीपाडवा मेळावा २०२६
स्थळ- शिवतीर्थ
वेळ- सायंकाळी ५ वाजता

#MNSAdhikrut

8 months ago | [YT] | 440

Amit Thackeray MNS Updates

सस्नेह जय महाराष्ट्र,
आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी सुरु होत आहे. काल छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझी सदस्य नोंदणी केली.

माझं महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना आवाहन आहे की या सदस्य नोंदणीतून तुम्ही महाराष्ट्र सैनिक नाही तर महाराष्ट्राचे पाईक होणार आहात. आमच्यासाठी तुमची जात, धर्म, राजकीय विचारधारा यापेक्षा तुम्ही महाराष्ट्र वेडाने झपाटलेले आहात हे पुरेसं आहे. महाराष्ट्रासाठी असंख्य आंदोलनं करणारा पक्ष, अनेक समाजपयोगी उपक्रम चालवणारा पक्ष, आणि महाराष्ट्राचा विस्तृत विकास आराखडा मांडणारा हाच पक्ष आहे. येत्या काळात आम्ही अनेक असे उपक्रम घेऊन येत आहोत ज्यातून महाराष्ट्राच्या विकासाला एक दिशा देणं शक्य आहे, आकार देणं शक्य आहे. या सगळ्यात सामील होण्याची संधी तुम्हाला आहे. ही संधी सोडू नका.

तुम्ही फक्त सदस्य न होता जर सक्रिय सदस्य होणार असाल तर विशेष आनंद आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कात टाकत आहे, त्या प्रक्रियेत तुम्हाला योग्य संधी मिळेल हे मी स्वतः पाहीन.

सदस्य नोंदणीसाठी महाराष्ट्रभर माझे सहकारी शाखांच्या बाहेर, आणि गर्दीच्या ठिकाणी स्टॉल्स लावणार आहेत. तुम्हाला तिथे जाऊन प्रत्यक्ष नोंदणी करायची असेल तरी हरकत नाही. नाहीतर खाली दिलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करून देखील तुम्ही सदस्य नोंदणी पूर्ण करू शकता.

या सदस्य नोंदणीत महाराष्ट्राचे पाईक होणाऱ्या प्रत्येकाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवारात सहर्ष स्वागत !

आपला नम्र

राज ठाकरे ।

8 months ago | [YT] | 289