महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली निर्भीड वृत्तवाहिनी शबनम न्यूज महाराष्ट्रातील जनतेला दैनंदिन घडामोडी ची बित्तंबातमी देण्याचे कार्य प्रामाणिकपणे करत आहे या वृत्तवाहिनीवर प्रसारित होणाऱ्या बातम्या या आपल्या परिसरातील घटनांवर आधारित असतात व प्रत्येक बातमी ही सोप्या भाषेत संपूर्ण सत्य समाजासमोर आणण्याचे कार्य करीत आहे.
अधिक बातम्यांसाठी आमच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
www.shabnamnewsonline.in
SHABNAM NEWS
SHABNAM NEWS
सिल्वर राईज इंडस्ट्रियल पार्कच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला नवी गती!
खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घाटन; स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार
पिंपरी-चिंचवड, दि. १६ ऑक्टोबर २०२६ : औद्योगिक विकासाला चालना देण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या सिल्वर राईज इंडस्ट्रियल पार्कचे उद्घाटन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या औद्योगिक पार्कमुळे परिसरातील उद्योगविस्ताराला चालना मिळण्यासह रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उद्घाटन सोहळ्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब महाराज काशीद आणि आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढवणे, या दृष्टीने सिल्वर राईज इंडस्ट्रियल पार्क महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराला नवी दिशा मिळण्याची शक्यता असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा लाभ होऊ शकतो.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपस्थित मान्यवर, उद्योजक आणि सहकाऱ्यांचे सिल्वर राईज ग्रुपच्या वतीने आभार मानण्यात आले. औद्योगिक प्रगतीसोबत रोजगारनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या या उपक्रमाकडे परिसरातील नागरिक आणि उद्योजकांचे लक्ष लागले आहे.
2 days ago (edited) | [YT] | 5
View 0 replies
SHABNAM NEWS
2 weeks ago | [YT] | 4
View 0 replies
SHABNAM NEWS
2 weeks ago | [YT] | 9
View 0 replies
SHABNAM NEWS
3 weeks ago | [YT] | 12
View 0 replies
SHABNAM NEWS
4 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
SHABNAM NEWS
4 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
SHABNAM NEWS
मोठ्या इमारतींनी नव्हे तर
कला-संस्कृतीच्या जतनाने शहराचा विकास : उपराष्ट्रपती राधाकृष्णन
३८ व्या पुणे फेस्टिव्हलचे दिमाखदार उद्घाटन
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार
केवळ मोठ्या आणि देखण्या इमारती उभ्या राहिल्याने शहराचा सर्वांगीण विकास होत नाही. शहराच्या विकासाबरोबरच कला, संस्कृती आणि परंपरांचे जतन करणेही आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीचे मूळ सोडून विकास साधता येणार नाही. परदेशी संस्कृती आणि वेशभूषेचे अनुकरण करण्यापेक्षा भारतीय संस्कृतीचे जतन करण्याची जबाबदारी आपलीच आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
३८ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पुणे फेस्टिव्हलच्या संरक्षक अभिनेत्री, नृत्यांगना खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षा मीरा कलमाडी, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते.
1 month ago | [YT] | 4
View 0 replies
SHABNAM NEWS
कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी मान्यवरांनी
सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे
-खासदार हेमा मालिनी
देशभरात विविध उत्सवांच्या माध्यमातून कला, नाटक, नृत्य आणि संगीत सादर करण्याची संधी कलाकारांना मिळते. मात्र, या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील नामांकित व्यक्तींनी सांस्कृतिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहणे आवश्यक आहे. कलाकारांचा सन्मान आणि त्यांच्या कलेला मिळणारी दाद त्यांचा आत्मविश्वास वाढवते. पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी विविध क्षेत्रांतील कलाकारांचा गौरव केला जातो, ही त्याची विशेष परंपरा आहे, असे मत मथुराच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी व्यक्त केले.
1 month ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
SHABNAM NEWS
पुणे फेस्टिव्हलमध्ये
उद्घाटन सोहळ्यातील सांस्कृतिक कर्यक्रम
उद्घाटन सोहळा – दरवर्षी प्रमाणे यंदाचा उद्घाटन सोहळादेखील नेत्रदीपक झाला. सुरुवातीला ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर व त्यांचे सहकारी यांच्या सुमधुर सनईने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. दीपप्रज्वलन व श्री गणेश आरती झाली.
या उद्घाटन सोहळ्यात नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रमाची झलक बघायला मिळेल.
गणेश वंदना - उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ ज्येष्ठ नृत्यगुरु शर्वरी जेमिनीस यांच्या कथक नृत्यशैलीतून साकारला गेला. त्यांच्या शर्वरी जेमिनीस डान्स कंपनीच्या १० शिष्या सहकलावंत होत्या. 'शेंदूर लाल चढायो' या ज्येष्ठ गायक महेश काळे यांनी गायलेल्या प्रसिद्ध आरतीवर ही गणेशवंदना सादर झाली.
1 month ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
SHABNAM NEWS
1 month ago | [YT] | 5
View 0 replies
Load more