वीरशैव दर्शन

शिवशरणार्थ,
आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार तसेच आपल्या धर्मातील, समाजातील आदर्श व्यक्तीचे अनुभव हे आपल्या सर्वासाठी आदर्शवत असतात. आपल्या धर्मातील धर्मगुरूंच्या आशीर्वचनातून, प्रवचनातून, किर्तनातून आपल्या समाजाचे समाजहित व्हावे यासाठी तसेच आपल्या धर्मातील अभंग,भजन, भारुड, शिवपाठ,किर्तन,शिवकथा,धार्मिक उत्सव,यात्रा,तिर्थक्षेत्र,मठ संस्थान या विषयी संपुर्ण समाजाला माहिती होण्याच्या उद्देशाने आपल्या वतीने "वीरशैव दर्शन" youtube channel चालू करत आहोत आपल्या सर्वासाठी हक्काचे व्यासपीठ..

यासाठी आपण समाजातील एक घटक म्हणून आपण आपले भजन, कीर्तन, भारुड, प्रवचन, कथासार वैगरे किंवा आपल्या परिचयातील आपल्या समाज बंधू - भगिनीचे दृकश्राव्य स्वरूपातील व्यवस्थित चित्रण केलेले साहित्य आपण आम्हाला पाठवावे आम्ही या "वीरशैव दर्शन" youtube channel वरून प्रक्षेपित करू.

या youtube channel मुळे आपणाला आपल्या धर्माचे ज्ञान मिळेल तसेच आपल्याच समाजातील गुणी व्यक्तींची ओळख मर्यादित न राहता ती सर्वाना होईल.

धन्यवाद !

संपर्क-
दिलीप स्वामी,मुंबई-9869417241
वैजनाथ स्वामी-9175906605